Vasco electric shock death Dainik Gomantak
गोवा

Tuyem Pernem: ..आनंदाची बातमी द्यायला चालले आणि गमावला जीव! तुये-पेडणेतील दुःखद घटना; गुरांना वाचवण्याचा नादात अपघाती मृत्‍यू

Tuyem Pernem Accident: तुये-पेडणे येथे झालेल्‍या गंभीर अपघातात जखमी झालेले अंकुश नागवेकर (४५, रा. चावदेवाडा-पार्से) यांचा मंगळवारी पहाटे गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्‍यू झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: तुये-पेडणे येथे झालेल्‍या गंभीर अपघातात जखमी झालेले अंकुश नागवेकर (४५, रा. चावदेवाडा-पार्से) यांचा मंगळवारी पहाटे गोमेकॉत उपचार सुरू असताना मृत्‍यू झाला. २१ डिसेंबर रोजी हा अपघात झाला होता.

अंकुश नागवेकर हे सध्या पेडणे येथे वास्तव्य करून होते. त्‍यांचे मूळ पार्से येथील आहेत. मोरजी येथे पेडणे तालुका मर्यादित बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेत त्यांच्या मुलाने प्रथम क्रमांक पटकावला होता. तो चषक दाखवून व आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन (मुलाची आजी) पार्से येथून पुन्‍हा पेडणे येथे जात असताना त्‍यांच्‍या दुचाकीला तुये इस्‍पितळासमोर अपघात झाला.

त्‍यात ते गंभीर जखमी झाले होते. मुलाला किरकोळ दुखापत झाली होती. दरम्‍यान, नागवेकर यांच्‍या अकाली निधनामुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्‍यांच्‍या पश्‍‍चात पत्नी, एक मुलगा व पाच विवाहित भाऊ असा परिवार आहे.

काळोखात गुरांच्‍या रूपाने बसला होता काळ!

दुचाकीवर मुलाला घेऊन पेडण्‍याच्‍या दिशेने निघालेले अंकुश नागवेकर यांना रस्‍त्‍यावर अंधारात बसलेल्‍या गुरांचा अंदाज आला नाही. त्‍या गुरांना वाचविण्‍याच्‍या नादात हा अपघात झाला व पिता-पुत्र रस्त्यावर आदळले. त्याचवेळी मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाची धडक बसल्‍याने अंकुश नागवेकर गंभीर जखमी झाले. उपचारांसाठी त्‍यांना गोमेकॉत दाखल करण्‍यात आले होते. अखेर आज त्‍यांची प्राणज्‍योत मालवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT