dumping waste in open Canva
गोवा

Tuyem: 'स्वच्छ तुये'साठी पंचायतीचा पुढाकार; उघड्यावर कचरा फेकताना आढळल्यास होणार 25 हजार रुपये दंड

Tuyem Panchayat: उघड्यावर कोणी कचरा फेकताना आढळला तर २५ हजार रुपये दंड करण्यात येईल, अशी माहिती तुयेचे पंच नीलेश कांदोळकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Tuyem Panchayat Fine For Waste Dump

मोरजी: तुये पंचायत क्षेत्र कचरामुक्त करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सध्या रस्त्याच्या बाजूला मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा फेकला जातो. त्यामुळे परिसर दुर्गंधीमय आणि अस्वच्छ होतो. उघड्यावर कोणी कचरा फेकताना आढळला तर २५ हजार रुपये दंड करण्यात येईल, अशी माहिती तुयेचे पंच नीलेश कांदोळकर यांनी दिली.

प्रत्येक नागरिकाने, तसेच ज्यांच्याकडे भाडेकरू आहेत, त्यांचा सुका कचरा तुये पंचायतीचे कामगार दर आठवड्याला बुधवारी घरोघरी येऊन गोळा करतील. त्यांच्याकडे सुका कचरा द्यावा. जे कोणी कचरा रस्त्यालगत, मोकळ्या जागेत फेकतील, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा ठरावही ग्रामपंचायत मंडळाने मंजूर केला आहे.

त्यामुळे सर्व नागरिकांनी कचरा इतरत्र न फेकता पंचायतीकडे द्यावा, असे आवाहन पंच नीलेश कांदोळकर यांनी केले. स्थानिक नागरिकांसोबत त्यांनी आपल्या प्रभागात घरोघरी जाऊन कचऱ्याविषयी जनजागृती केली. नंतर त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

गाव सुंदर राखण्यासाठी केवळ पंचायत मंडळानेच नव्हे, तर प्रत्येक नागरिकाने सहकार्य करण्याची गरज आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून गाव कचरामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन कांदोळकर यांनी केले.

ओल्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावणार

सध्या पंचायत क्षेत्रातील सुका कचरा उचलण्यासाठी पंचायत मंडळ प्रयत्न करत आहे. भविष्यात ओल्या कचऱ्याचीही विल्हेवाट लावण्यासाठी पुढाकार घेतला जाईल. त्यासाठी अगोदर सर्व नागरिकांनी सुका कचरा पंचायतीच्या कामगारांकडे सुपूर्द करावा. तुये पंचायत क्षेत्रात जास्त करून औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रमाणात बिगर गोमंतकीय भाडेकरू राहतात. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याची समस्या निर्माण होते, असे कांदोळकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT