Tuyem Gram Sabha Dainik Gomantak
गोवा

Tuyem Hospital: इस्पितळ नव्या इमारतीत हलविण्यास विरोध! तुयेच्या विशेष ग्रामसभेचा ठराव

Tuyem Gram Sabha: दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीत त्वरित नियोजित इस्पितळ सुरु करण्याची मागणी

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे: तुये येथे दहा वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या इमारतीत त्वरित नियोजित इस्पितळ सुरु करण्यात यावे. तसेच आरोग्य खात्यातर्फे सध्या सुरू असलेल्या तुये येथील इस्पितळाची इमारत चांगल्या स्थितीत असल्याने त्याच इमारतीत हे इस्पितळ कार्यरत असावे. हे इस्पितळ नव्या इमारतीत हलविण्यास विरोध राहील, असा ठराव तुयेच्या विशेष ग्रामसभेत संमत करण्यात आला.

तुळशीदास राऊत यांनी हा ठराव मांडला, या सभेला सरपंच सुलक्षा नाईक. उपसरपंच मनोहर पेडणेकर, पंच उदय मांजरेकर, अनिल हरमलकर, नीलेश कांदळकर व स्वीटी नाईक यांची उपस्थिती होती.

मुख्यमंत्र्यांशी चर्चा

गेल्या ६ ऑगस्ट रोजी आमदार जीत आरोलकर यांच्या सोबत तुये नागरिक समितीतर्फे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची भेट घेतली, तेव्हा मुख्यमंत्र्यानी शस्रक्रिया डॉक्टर व भुलतज्ज्ञाची नेमणूक करण्यात येईल. तसेच सध्याचे इस्पितळ या नव्या इमारतीत हलविण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु समितीने इस्पितळ नव्या इमारतीत नेण्याचा प्रस्ताव मान्य नसून तिथे गोमेकॉशी संबंधित इस्पितळ त्वरित मार्गी लावण्याची मागणी केली आहे, असे तुळशीदास राऊत यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

Goa Opinion: ‘गोंयकारांनी’ घरांसाठी सरकारी दयेवर अवलंबून राहावे का?

Diwali In Goa: 'तिखशे फोव, वझ्या’त खाजीचे लाडू, फेणोरी, चुरमो'! गोव्यातील आगळीवेगळी दिवाळी

SCROLL FOR NEXT