Goa Mining Dainik Gomantak
गोवा

Goa Mining: नेसाय येथे खडीच्या भुकटीचे ट्रक रोखले

Goa Mining: पोलिसांनी हे ट्रक ताब्‍यात घेऊन आवश्‍‍यक ती खबरदारी न घेता खडीची भुकटी वाहून नेल्‍याच्‍या आराेपाखाली या ट्रकांविरोधात दंडात्‍मक कारवाई केली.

दैनिक गोमन्तक

Goa Mining: खनिज आणि अन्‍य मालाची वाहतूक ताडपत्रीचे आवरण घालून करण्‍यात यावी, असे स्‍पष्‍ट निर्देश मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेले असताना नेसाय भागातून होणाऱ्या खडीच्‍या भुकटीची वाहतूक करणारे ट्रक साधे तकलादू कापड झाकून ही वाहतूक करतात, असा दावा करून नेसायवासीयांनी बुधवारी हे ट्रक अडविले.

त्‍यानंतर पोलिसांनी हे ट्रक ताब्‍यात घेऊन आवश्‍‍यक ती खबरदारी न घेता खडीची भुकटी वाहून नेल्‍याच्‍या आराेपाखाली या ट्रकांविरोधात दंडात्‍मक कारवाई केली. असे तकलादू आवरण घालून केलेल्‍या वाहतुकीमुळे खडीची भुकटी वाऱ्यामुळे सर्वत्र पसरून धूळ प्रदूषण होते, असा आरोप पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते फ्रेडी ट्रावासो यांनी केला.

बुधवारी दुपारी १२ च्‍या सुमारास हे ट्रक अडविण्‍यात आले. त्‍यानंतर पंचसदस्‍यांनाही घटनास्‍थळी बोलावले. नेसायमधून अशी वाहतूक होणे आम्‍ही खपवून घेणार नाही,अशा इशारा आक्रमक स्‍थानिकांनी दिला. रितसर ताडपत्री घालून ही वाहतूक केली तर आमची कुठलीही हरकत नाही. मात्र अशाप्रकारे कपड्याचे आवरण घालून केली जाणारी वाहतूक आम्‍ही बंद पाडू, असा इशारा ट्रावासो यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT