Goa Accident  Dainik Gomantak
गोवा

खांडेपार येथे ट्रक-टेंम्पो अपघात; चालक जखमी

खांडेपार जुन्या पुलावर ट्रक आणि टेंपो यांच्यातील अपघातात टेंपोची मोडतोड झाली.

दैनिक गोमन्तक

फोंडा: खांडेपार येथील जुन्या पुलावर रात्री अवजड ट्रक व दूधवाहू टेंम्पो यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत टेंम्पोचालक जबर जखमी झाला. टेंम्पोतील अन्य एकजण किरकोळ जखमी झाला. हा अपघात बेळगावहून गोव्यात दूध घेऊन आलेल्या एमएच 09 एफएल 5245 या क्रमाकांच्या टेंम्पो व केए 22 एल 9348 या क्रमांकाचा अवजड ट्रक यांच्यात झाला. टेंम्पो फोंड्याच्या दिशेने तर ट्रक उसगावच्या दिशेने जात होता.

भरधाव ट्रकची ठोकर बसल्याने टेंम्पोचे मोठे नुकसान झाले असून टेंम्पोचालक किरण रेडकर हा गंभीर जखमी झाला. त्याला बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टेंम्पोमधील विजय हेगडे हा किरकोळ जखमी झाला. दोघेही कोल्हापूर येथील रहिवासी आहेत. फोंडा पोलिसांनी पंचनामा केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Childhood Depression: स्मार्टफोन आणि नैराश्य

Goa Monsoon: गोव्यात मान्सूनचे आगमन; हवामान विभागाडून चार दिवसांचा 'यलो अलर्ट'!

मालपे येथील संरक्षक भिंत पुन्हा धोक्यात; पावसाळ्यापूर्वी तातडीने दुरुस्ती करण्याची स्थानिकांची मागणी

Goa Power Cuts: हसापूर, हणखणेतील वीज समस्या सोडवा; काँग्रेस कार्यकर्त्यांची वीज कार्यालयावर धडक, साहाय्यक अभियंत्यांशी चर्चा

Hasapur Bridge: हसापूर पूल महिन्याभरात वाहतुकीस खुला; काँक्रीटचे काम पूर्ण

SCROLL FOR NEXT