Panjim Accident Dainik Gomantak
गोवा

Panjim Accident : पुन्हा रस्त्यात कलंडला ट्रक; स्मार्ट पणजीत गेल्या पंधरा दिवसातील तिसरी घटना

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत कामे सुरू आहेत

Rajat Sawant

Panjim Accident: केंद्र सरकारच्या अमृत मिशन अंतर्गत पणजीला स्मार्ट सिटी बनवण्याचा नादात नागरिकांना जीव मुठीत घेऊन घराबाहेर पडावे लागते. उखडलेल्या, अडवलेल्या रस्त्यांमुळे जनतेची दैना होत आहे.

राजधानी पणजीत स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कामामुळे ठिकाठिकाणी रस्त्याच्या बाजूने चर खोदण्यात येत आहेत. काम झाल्यावर त्यावर माती घालण्यात येते. मात्र, अवजड वाहने त्या मातीवरून गेल्यावर माती खचल्याने वाहने अडकून पडण्याची तसेच कलंडण्याचे प्रकार घडत आहेत.

याच स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीत खोदण्यात आलेल्या खड्ड्यात ट्रक रस्त्यात कलंडल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे. ही दुर्घटना पणजीतील आझाद मैदान येथे घडली. या घटनेत सुदैवाने जिवीतहानी झाली नाही.

गेल्या पंधरा दिवसात पणजीत रस्त्यात ट्रक कलंडल्याची ही तिसरी घटना आहे. गुरुवारी मध्यरात्री एक ट्रक सीमेंटचे पाईप घवून जाताना आझाज मैदान येथे आल्यावर उजव्या बाजूने मागील चाके खड्ड्यात गेल्याने कलंडला.

ट्रक कलंडल्याची पहिली घटना ही पणजीतील काकुलो मॉलच्या परिसरात घडली. दुपारच्या सुमारास चिरे भरलेला ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्मार्ट सिटीच्या खड्ड्यातच उलटा झाला. यावेळी खड्ड्यात काम करणाऱ्या मजुरांवर चिरे पडल्याने 4 जण जखमी झाले होते.

तर दुसरी घटना ही 10 फेब्रुवारी रोजी सकाळी बाराच्या सुमारास टोक येथे कामत कॉम्प्लेक्स समोर अशाच प्रकारे खड्ड्यात सांडपाण्याचा टॅंकर कलंडला. पणजीत होणाऱ्या घटनांमुळे तेथील स्थानिकांनी संताप व्यक्त केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT