Accident in Chorla Ghat Dainik Gomantak
गोवा

चोर्ला घाटात दोन ट्रकांचा भीषण अपघात

अवजड वाहतुकीला बंदी असूनही केराची टोपली; अपघातात ट्रकांचा चक्काचूर

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात अपघातांचं सत्र अजूनही सुरुच असल्याचं चित्र आहे. गिरीमधील ट्रक्सचा अपघात ताजा असतानाच चोर्ला घाटात दोन ट्रकांचा अपघाच झाला आहे. बुधवारी सकाळीच दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन मालवाहू ट्रकांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे.

चोर्ला घाट ते साखळी दत्तवाडी या मार्गाच्या दुरुस्ती आणि हॉटमिक्सिंगचे काम सध्या हाती घेण्यात आले आहे. या कामामुळे चोर्ला घाटमार्गे अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली होती. मात्र बंदीच्या पहिल्याच दिवशी चोर्ला घाटात दोन ट्रकचा अपघात झाल्याने या बंदीला केराची टोपली दाखवल्याचं आता समोर आलं आहे. या दोन ट्रकच्या अपघातामुळे चोर्ला घाटाच्या रस्ते दुरुस्तीच्या कामात अडथळा आला आहे. चोर्ला घाटात एक ट्रक नियंत्रण गेल्याने रस्त्याच्या बाजूला जाऊन कलंडला, तर दुसरा ट्रक झाडावर जाऊन धडकला आहे. अपघातांमध्ये जीवितहानी झाली नसली तरीही दोन्ही ट्रकचं मोठं नुकसान झालं आहे.

कर्नाटक-गोवा सीमेवर असणारा चोर्ला घाट नेहमीच वाहतुकीसाठी गजबजलेला असतो. मात्र या घाटात अपघातांची संख्याही जास्त आहे. अनेकवेळा दरड कोसळल्यामुळे चोर्ला घाट वाहतुकीसाठी बंदही ठेवला जातो. सध्या या रस्त्याची अनेक ठिकाणी चाळण झाल्याचं चित्र आहे. रस्त्याची दुरवस्था पाहून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चोर्ला ते साखळी या मार्गाच्या ऑडिटचे आदेश दिले आहेत. तसंच चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित रस्त्याचे काम पाहणाऱ्या अभियंत्यांनाही निलंबित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT