Truck Accident in Canacona Dainik Gomantak
गोवा

गोव्यात अपघातांचं सत्र सुरुच, काणकोणमध्ये ट्रक पलटी

मनोहर पर्रीकर बगल मार्गाचे रेलिंग तोडून ट्रकचा अपघात

Subhash Mahale

काणकोण : गोव्यात अपघातांचं सत्र काही थांबताना दिसत नाही. शुक्रवारी गोव्यात ठिकठिकाणी झालेल्या अपघातांनंतर आता काणकोणमध्येही ट्रकचा अपघाच झाला आहे. वास्कोहून कर्नाटकला जाणारा खनिजवाहू ट्रक गालजीबाग येथे रेलिंग तोडून पलटी झाला. (Truck Accident in Canacona News Updates)

वास्कोहून हॉस्पेट कर्नाटक (Karnataka) येथे जाणारा खनिजवाहू ट्रक गालजीबाग येथे मनोहर पर्रीकर बगल मार्गाचे रेलिंग तोडून पलटी झाला. हा अपघात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे.अपघातग्रस्त KA 37 B 3942 या ट्रकने महामार्गाचे सुमारे पन्नास मीटर रेलिंग तोडून तो रस्त्याच्या खाली पलटी झाला. या अपघातात (Accident) ट्रक चालक आणि क्लिनर जखमी झाला आहे.

दरम्यान हा अपघात झाला त्याच्या काही मीटर अंतरावरच एक घर आहे. त्यामुळे हा अपघात घराजवळ झाला असता तर मोठा अनर्थ झाला असता. असं असलं तरीही गोव्यात (Goa) वाढलेल्या रस्ते अपघातांमुळे प्रशासनाची डोकेदुखी मात्र वाढली आहे. काल शुक्रवारी एकाच दिवसात गोव्यात ठिकठिकाणी अपघात झाले, यात जवळपास 7-8 जण जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT