Trinamool Congress Leander Paes impressed by Goan Bakers tattoos Dainik Gomantak
गोवा

तृणमूलचे लिएंडर पेस गोवा बेकरच्या टॅटूने प्रभावित

लिएंडर पेस सारख्या प्रसिद्ध खेळाडूचा साधेपणा आश्चर्यचकित करणारा आहे.

दैनिक गोमन्तक

कळंगुट: गोव्यात निवडणुकीचे बिगूल वाजले (Goa Elections) आहे. प्रचारासाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. 2022 मध्ये होणाऱ्या गोवा विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहायला लागले. दरम्यान टेनिस स्टार आणि तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते लिएंडर पेस (Leander Paes) आज कळंगुटमधील एका बेकरी मालकाशी गप्पा मारताना दिसले. गोयांची नवी सकाळ या ट्विटर हॅंडलवरून शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये लिएंडर पेस त्या व्यक्तीचे कौतुक आणि त्याच्या खेळाविषयी असलेल्या प्रेमाच कौतुक करत होते.

बेकरी मालकाने त्याच्या हातावर डेव्हिड बेकहॅम आणि पाओलो मालदिनी यांसारख्या फुटबॉल दिग्गजांच्या नावांचा टॅटू बनवला होता. "खेळ आणि बेकरी त्यापैकी मला आता बेकरी आवडते." असे टॅटू पाहून पेस म्हणाले.

"लिएंडर पेस सारख्या प्रसिद्ध खेळाडूचा साधेपणा आश्चर्यचकित करणारा आहे. आज कळंगुट येथे घरोघरी जावून प्रचारादरम्यान त्यानी मनमोकळ्या गप्पा मारल्या," असे कॅप्शन तृणमूलने आपल्या पोस्टला दिले आहे.

मिस्टर पेसने त्या व्यक्तीच्या हातावर असलेल्या टॅटूवरील नावे एक एक करून वाचली आणि आश्चर्यचकित झाले. त्या व्यक्तीच्या हातावर तीन टॅटू होते. त्यापैकी तिसरा टॅटू युरोपमधील फुटबॉलची प्रशासकीय संस्था UEFAचा होता. त्या व्यक्तीच्या हातावर आणखी दोन नावे होती परंतु त्या व्यक्तीने त्यासंबधी माहिती सांगण्यास नकार दिला.

पेस यांनी ऑक्टोबरमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी पक्षाच्या प्रमुख आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. दुसऱ्या दिवशी प्रचारात सामील होण्यापूर्वी पक्षाच्या गोवा युनिटच्या बैठकीला संबोधित करताना "गोव्यातपाणी, महिला सुरक्षा आणि खाणकाम यासारख्या महत्वाच्या सेवेसाठी आम्ही काम करू," असे आश्वासन पेसने दिले होते.

गोवा विधानसभेत 40 जागा आहेत. सध्याच्या विधानसभेत भाजपकडे 17 आमदार आहेत आणि त्यांना महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (MGP) आणि इतर प्रादेशिक पक्षांच्या आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीत गोव्याचा मासा कुणाच्या गळाला लागतो हे तर येणारा काळच सांगले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT