Trinamool Congress  Dainik Gomantak
गोवा

खासदार महुआ माेहित्रा यांची बैठक तृणमुल काँग्रेसचे बुथ पातळीवर काम सुरू!

यावेळी खासदार महुआ माेहित्रा यांनी सांगितले की वाळपई मतदारसंघात काम याेग्य दिशेने सुरू असुन विश्वजित राणे यांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी तृणमुल काँग्रेस हा एकमेव पर्याय आहे.

दैनिक गोमन्तक

वाळपई : वाळपई (Walpai) मतदारसंघात तृणमुल काँग्रेसचे काम जाेरात सुरू असुन खासदार व गाेवा प्रभारी महुआ माेहित्रा यांनी शनिवारी वाळपईत बैठक घेतली. वाळपई मतदारसंघात बुथ पातळीवर काम सुरू झाले असून प्रत्येक बुथ वर काम करण्याचा संकल्प केला आहे. यावेळी खासदार महुआ माेहित्रा (Member of the Lok Sabha Mahua Moitra) यांनी सांगितले की वाळपई मतदारसंघात काम याेग्य दिशेने सुरू असुन विश्वजित राणे यांच्या विरोधात टक्कर देण्यासाठी तृणमुल काँग्रेस (Trinamool Congress) हा एकमेव पर्याय आहे.

वाळपई मतदारसंघात सध्या घरघर चलाे अभियान सुरू असुन त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. वाळपई मतदारसंघात काम आणखिन जाेर धरण्यासाठी त्यांनी अनेक सुचना केल्या. वाळपई येथे झालेल्या बैठकीला मये येथील तृणमुल काँग्रेस नेते आनंद नाईक, वाळपई तृणमुल काँग्रेस नेते दशरथ मांद्रेकर, सुरेश काेदाळकर, महम्मद खान, विठाेबा गांवकर, विजय मांद्रेकर याबरोबर वाळपई मतदारसंघातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दशरथ मांद्रेकर यांनी महुआ माेहित्रा बरोबर विविध विषयांवर चर्चा केली. त्यानंतर खासदार महुआ माेहित्रा यांनी वाळपईतील श्री हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तृणमुल काँग्रेस पक्षाच्या खासदार महुआ माेहित्रा यांनी वाळपईत बैठक घेतली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. वाळपई भेटीवेळी श्री हनुमान मंदिरात दर्शन घेताना खासदार महुआ माेहित्रा सोबत दशरथ मांद्रेकर.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL 2026: आयपीएल ब्रेकिंग! मुंबई-कोलकाता सामना संपताच मूत्यू; मुंबईतील हॅाटेलमध्ये सापडला मृतदेह

Guru Gochar 2026: नशिबाचा मास्टरस्ट्रोक! 'या' 5 राशींसाठी एप्रिल महिना ठरणार 'टर्निंग पॉईंट'; धन वर्षावासह करिअरमध्ये प्रगतीची संधी

US Iran War: 21 युद्धनौका, 3500 कमांडो, 50000 सैनिक… तरीही ट्रम्प इराणचे 440 किलो युरेनियम जप्त करु शकणार नाहीत, कारण काय?

Yellow Alert In Goa: हुश्श! गोव्याचा उकाडा कमी होणार; हवामान खात्याकडून पुढच्या 48 तासांसाठी पावसाचा अंदाज, 'यलो अलर्ट' जारी

पाकड्यांच चाललंय काय? शाहीन आफ्रिदीनं सिकंदर रझाला गुपचूप हॉटेलमध्ये नेलं; रात्री 2 तास दोघांमध्ये... बोर्डानं ठोठावला 10 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT