Goa TMC : Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

लुईझिन फालेरोंना तृणमुलकडून उमेदवारी जाहीर, पण..

लुईझिन फालेरो यांच्यासाठी ही चुरशीची लढत ठरणार आहे

दैनिक गोमन्तक

आगामी काळात गोव्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. याच पाश्वभूमीवर गोव्यात प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूकीच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. राज्यात सत्तेत असणाऱ्या भाजपला पराभूत करण्यासाठी विरोधक चांगलचे तयारीला लागले आहेत. राजकीय नेते प्रचारसभांच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. याच पाश्वभूमीवर TMC ने गोवा (goa) निवडणुकीसाठी 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

यात फातोर्डा मतदार संघातून लुईझिन फालेरो यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ते गोव्याचे माजी मुख्यमंत्री व गांधी घराण्याचे जवळचे असलेले काँग्रेसचे आमदार होते. त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्ष सोडलेला आहे. आणि तृणमूलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांना तृणमूल कडून उमेदवारी जाहीर झाली आहे. गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) सर्वेसर्वा विजय सरदेसाई (Vijay Sardesai) हे या मतदारसंघाचे आमदार आहेत. विजय सरदेसाई यांच्यासाठीआणि लुईझिन फालेरो यांच्यासाठी ही चुरशीची लढत ठरणार आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT