पिसुर्ले: पर्ये (Poriem) मतदार संघातील सालेली हा गाव गेल्या कित्येक वर्षांपासून विविध कारणांमुळे प्रकाशाच्या झोतात आहे, गावच्या वरच्या बाजूला असलेल्या वाघेरी डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावाला नैसर्गिक (Nature) वरदान लाभलेले आहे, त्यामुळे आज राज्यातील तसेच शहरी भागातील पर्यटक (Goa Tourism) पावसाळी पर्यटनासाठी या गावाकडे वळत असतात, शेतकरी संस्कृतीचा (Agriculture) वारसा असलेल्या या गावातील युवक आज जागृत होऊन पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी झटत आहे, त्याच अनुषंगाने सालेली गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंगरावर गावातील युवकांनी विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून पर्यावरण जतन करण्याचा संदेश दिला आहे. (Tree planting by local youth on Saleli fort)
या भागात गडावर म्हटले की सालेलीचा डोंगर डोळ्यासमोर येतो, पुर्वीच्या काळी सालेली गडावर आदिवासी गौळी धनगर समाजाची मोठ्या प्रमाणात लोकवस्ती होती, परंतू गोवा मुक्ती नंतर जंगलावर सरकारी नियम लागू झाल्याने त्या समाजातील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर व्हावे लागले, तेव्हा पासून गडावर नागरिकांची वर्दळ कमी आहे, त्याच प्रमाणे विविध कारणांमुळे झाडाची संख्या घटली आहे, यांची दखल घेऊन सालेली गावातील होतकरू युवकांनी जंगल भ्रमण करून गडावर विविध प्रकारच्या फळ झाडांची लागवड केली व सालेली गावातील युवा पिढी पर्यावरण जतन साठी किती गंभीर असल्याचे दाखवून दिले आहे.
यावेळी युवकांनी आंबा, फणस, जांभुळ, भिरंड, शिवण अशा प्रकारच्या विविध झाडांची लागवड डोंगर पठारावर केली, या वृक्षारोपण अभियानात सत्तरी अर्बन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मण गावस, पोलिस खात्याचे निलेश फगेरी, यांच्यासह रघुनाथ गावकर, सचिन गावकर, अभिजित गावकर, राजेंद्र गावस, रूपेश गावकर, सचिन नाईक, पुती गावकर, प्रवीण गावकर, विशाल नावेलकर आदीचा सहभाग होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.