Mauvin Gudinho Dainik Gomantak
गोवा

Accident News: अपघाती मृत्‍यू आलेल्‍यांच्‍या कुटुंबाला 2 लाख; वाहतूकमंत्री माविन गुदिन्होंची मोठी माहिती

राज्यात अपघातात मृत्यू आलेल्‍याच्‍या कुटुंबीयांना दोन लाख रुपये वित्तीय साहाय्य देण्याची योजना सरकारकडून मार्गी लावली जाईल, अशी माहिती माविन गुदिन्हो यांनी दिली.

दैनिक गोमन्तक

Accident News: राज्यात अपघातात मृत्यू आलेल्‍याच्‍या कुटुंबीयांना दोन लाख रुपये वित्तीय साहाय्य देण्याची योजना राज्य सरकारकडून मार्गी लावली जाईल, अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. ते म्‍हणाले, वाहतूक खात्याकडून ही योजना आखण्यात आली असून, याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी सविस्तर चर्चा झालेली आहे.

राज्‍यात कोणत्याही प्रकारच्या अपघातात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. सदर योजनेनुसार संबंधितांना दोन लाख रुपये आर्थिक साहाय्य किंवा भरपाई म्हणून दिले जातात.

राज्यात रस्‍तेअपघातांचे प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा अपघातात घरातील एकमेव कमावती वा महत्त्वाची व्यक्ती मृत्यू पावते. त्यामुळे त्‍या कुटुंबाचे दीर्घकालीन मोठे नुकसान होते. म्‍हणूनच या मृतांच्‍या नातेवाईकांना आर्थिक साहाय्य योजनेचा मुद्दा नव्याने पुढे आला आहे.

सदर योजना यापूर्वीही राज्यात सुरू होती, पण आता ती नव्याने मार्गी लावणार आहे. यापूर्वी ज्या अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी सदर योजनेसाठी अर्ज केले होते, त्या सर्वांना ही योजना मंजूर करण्यात आली आहे. त्‍यामुळे त्‍यांना थोडा तरी दिलासा मिळेल. - माविन गुदिन्हो, वाहतूकमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: काँग्रेस-भाजपमधील शीतयुद्ध

Viral: 8 कोटींचे दागिने घालून नववधू मंडपात; पण व्हिडिओ व्हायरल होताच पोलिसांची एन्ट्री अन् वराला ठोकल्या बेड्या! नेमकी भानगड काय? Watch Video

Goa Crime: पर्वरी गोळीबाराचा कट उघडकीस येणार? यूपी-मुंबईतील तिघांना अटक; पोलिसांसमोर मुख्य सूत्रधाराचा शोध घेण्याचं मोठं आव्हान

Bank Holiday: संप, शनिवार-रविवारची सुट्टी अन्‌ गणेश चतुर्थी! शुक्रवारपासून बँका सलग 5 दिवस बंद; ग्राहकांची होणार गैरसोय

Horoscope: शुक्रवार ठरणार भाग्यवान! 'या' राशींना मिळणार शुभवार्ता; नोकरी, व्यवसायात यशासोबत आर्थिक लाभाचीही शक्यता

SCROLL FOR NEXT