Goa Taxi App | Taxi  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi App : टॅक्सी अ‍ॅपबाबत वाहतूक मंत्र्यांचा मोठा खुलासा; पेडणेवासीयांसाठीही बंपर धमाका

एमपीटी'वर स्थापणार पर्यटन खात्याचे टॅक्सी काऊंटर

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा टॅक्सी अ‍ॅप विषय मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार असून त्यानुसारच यावर निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आज वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांनी दिली आहे. तर पर्यटन मंत्र्यांनी मोपावरील टॅक्सीसेवेसाठी पेडणेतील स्थानिकांनाच प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

(Transport minister Mauvin Godinho said proposed new Goa taxi app will be brought before the next cabinet for approval )

मिळालेल्या माहितीनुसार मंत्री गुदिन्हो यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी गोवा इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (GEL) ने गोवा टॅक्सी अ‍ॅप विकसित केले आहे. ते या “अ‍ॅप आधीच विकसित आणि डिझाइन केलेले आहे. मात्र मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी मांडले जाणार आहे. गोवा मुक्तिदिनी हे अ‍ॅप सुरू करण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारने ठेवले होते, मात्र ते आता पुढे ढकलण्यात आले आहे. अशी माहिती दिली आहे.

गोवा टॅक्सी अ‍ॅपला काही टॅक्सी मालक आणि ऑपरेटर यांचा विरोध आहे, कारण त्यांना फक्त त्यांची मक्तेदारी चालवायची आहे. त्यामुळे त्यांना हा विरोध करावा वाटत असल्याचं मंत्री गुदिन्हो म्हणाले. पुढे बोलताना मंत्री गुदिन्हो म्हणाले की, हे अ‍ॅप लाँच झाल्यानंतर पर्यटकांना चांगली सेवा देण्यासाठी अ‍ॅपवर नोंदणी करावी लागेल.

टॅक्सी मालक आणि ऑपरेटर यांना अ‍ॅपद्वारे कमावलेल्या प्रत्येक 100 रुपयांपैकी 5 रुपये अ‍ॅपच्या देखभालीसाठी आणि 5 रुपये कल्याणकारी योजनांसाठी कापले जातील. आणि 90 रुपये थेट मालक आणि ऑपरेटरकडे जातील. तसेच पर्यटकांचा छळ थांबण्यासाठी सरकार गांभिर्याने विचार करत असल्याचं मंत्री गुदिन्हो यांनी म्हटले आहे.

याबरोबरच आमदार संकल्प आमोणकर यांनी माहिती देताना सांगितले आहे की, गोवा पर्यटन खात्याच्या बैठकीत टॅक्सी काऊंटर मुरगाव बंदरावर (Mormugao Port Trust ) स्थापन्यात येणार आहे. तसेच पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी मोपा विमान तळावरील टॅक्सी सेवेसाठी पेडणेवासियांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

Ahmedabad Lawyer Scam: 'थेरपिस्ट' सोबतची गोवा ट्रीप ठरली 'हनिट्रॅप'

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

SCROLL FOR NEXT