Mauvin Godinho Dainik Gomantak
गोवा

Mauvin Godinho: आणखी 1000 बेरोजगार युवकांना टॅक्सी देणार

वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांची माहिती

Akshay Nirmale

Mauvin Godinho: ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचा एक भाग म्हणून आगामी वर्षभरात आणखी 1000 बेरोजगार युवकांना टॅक्सी व्यवसायात आणणार असल्याची माहिती, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली.

गोयंचो टॅक्सी पात्राव या योजनेतून 1000 बेरोजगार युवकांना टॅक्सी देण्यात येणार आहे, अशी माहिती, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. आज, मंगळवारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक झाली. त्यातील निर्णयांची माहिती गुदिन्हो यांनी दिली.

गोयचो टॅक्सी पात्राव योजनेची नुकतीच सुरवात करण्यात आली असून त्यातून काही दिवसांपुर्वीच 55 लाभार्थ्यांना टॅक्सी सुपुर्द करण्यात आली होती. महिलांनाही स्वयंपूर्ण करणारी ही योजना असून याद्वारे महिला देखील टॅक्सी पात्राव झाल्याचा आनंद झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तेव्हा म्हणाले होते.

टॅक्सी दिलेल्या 55 पैकी 12 जणांच्या घरात सायकलदेखील नाही. ते टॅक्सीचालकही नाहीत. पण ते आज टॅक्सीचे मालक झाले आहेत. एक पैसा न देता टॅक्सी मिळणार असल्याने याचा लाभ घ्या, असेही मुख्यमंत्री म्हणाले होते.

दरम्यान, या योजनेत सुरवातीला पेडणेतील नागरिकांना प्राधान्य दिले आहे. गोवा माईल्स आणि वाहतूक खात्याच्या संयुक्त विद्यमाने ही योजना सुरू केली आहे. ग्रामीण भागातील ज्यांना टॅक्सी व्यवसायात यायचे आहे, त्यांना टॅक्सीसाठी डाऊन पेमेंट म्हणून एक लाख रुपये निधी मिळेल.

त्या पुढील हप्ते लाभार्थीला भरावे लागतील. या टॅक्सी थेट गोवा माईल्सच्या ॲपवर चालतील. या टॅक्सी या सीएनजीवर चालणार असल्याने त्या पर्यावरणपूरक असतील. त्यासाठी सीएनजी आणि ई-चार्जिंग सुविधा करण्यात येणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

Goa crime: एडिसन सोरंग खूनप्रकरणी दोघांना जन्मठेप; किरकोळ वादाचे हत्येत रुपांतर, फावड्याने वार करून मित्राला संपविले

Donald Trump: "त्यांच्या 'किल लिस्ट'मध्ये मी टॉपवर!", हत्येच्या कारस्थानाचा आरोप करत ट्रम्प यांनी मोडला इराणसोबतचा शांतता करार; युद्धाचा उडणार भडका?

Mangal Gochar: नशीब बदलणार, गरिबी हटणार! 'या' 5 भाग्यशाली राशींवर होणार पैशांचा पाऊस; 24 जुलैपासून मंगळ देवाचा महाधमाका

SCROLL FOR NEXT