New Vaddem housing ownership decision Dainik Gomantak
गोवा

Goa Transport Ministry: नवे वाडे येथील ५४४ घरे संबंधितांच्या नावावर होणार, गोवा गृहनिर्माण मंडळाच्या जागेबाबत मंत्र्यांचा मोठा निर्णय, नागरी हिताला प्राधान्‍य

Mauvin GodinhoStatement On Traffic Violations: राज्‍यात महत्त्वाच्या ठिकाणी ‘एआय’ कॅमेरे लावल्याने अपघातसंख्या कमी झाल्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. हे

दैनिक गोमन्तक डिजिटल

वास्को: राज्‍यात महत्त्वाच्या ठिकाणी ‘एआय’ कॅमेरे लावल्याने अपघातसंख्या कमी झाल्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले. हे काम पूर्ण झाल्‍यावर अपघातांच्या संख्येत मोठी घट होईल, असेही ते म्हणाले. नवे वाडे येथील गोवा गृहनिर्माण मंडळाच्या जागेतील ५४४ घरे संबंधितांच्या नावावर करण्याचा निर्णय घेतल्‍याचे ते म्‍हणाले.

सार्वजनिक प्रसाधनगृहाच्‍या उदघाटनानंतर आज पत्रकारांना त्‍यांनी ही माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष गिरीश बोरकर, नगरसेवक सुदेश भोसले, विनोद किनळेकर, चिखलीच्या उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते. वाहनचालकांकडून गोळा केलेल्या दंडाची रक्कम विविध उपकरणे खरेदी करण्यासाठी वापरली जाते. वाहने, थर्मल कॅमेरा, बॉडी कॅमेरा, अल्कोमीटर वगैरेसाठी दंडाची ५० टक्के रक्कम खर्च करण्यात येत असल्याचे मंत्री गुदिन्हो म्हणाले.

माविन म्‍हणाले...

  • १ राज्यातील अपघातांची संख्या कमी व्हावी, यासाठी संवेदनशील व अपघाताचा अधिक धोका असलेले ब्लॅक स्पॉट हटविले आहेत. तेथील वळण कमी करताना रस्त्याचे रुंदीकरणही केले आहे.

  • २ तेथे कॅमेरे, दिवाबत्तीची सोय केली आहे. वाहतूक नियम मोडल्यास चलन घरच्या पत्त्यावर येईल. त्यामुळे दंड कमी करण्यासाठी पूर्वी जी धडपड केली जात होती, ती बंद होणार आहे.

  • ३ लवकरच राज्य मंडळाची बैठक होईल. त्या बैठकीत अपघातासंबंधी व आखलेल्या उपाययोजनासंबंधी चर्चा करण्यात येईल.

करार व्‍यवहार अंतिम टप्‍प्‍यात

घरे नावावर करण्याचे सोपस्कार अंतिम टप्प्यावर पोचले आहेत. मुरगाव पालिका व गृहनिर्माण मंडळ यांच्यात करारवजा व्यवहार पूर्ण झाला आहे. आता मुरगाव पालिका व मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरण यांच्यामध्ये अंतिम व्यवहार झाला की ती घरे नावावर होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे, असे गुदिन्हो म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

October 2026 Rules Change: 1 ऑक्टोबरपासून बदलणार 9 मोठे नियम! खिशाला लागणार कात्री, महागाई आणि बचतीवर होणार परिणाम; सणासुदीच्या तोंडावर आर्थिक झटका

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' हॅटट्रिक! पुरुष कंपाउंड संघाने मिळवला रोमांचक विजय; फायनलमध्ये चीनला दिली मात

Kharif Sowing Area Decline: पेरणीखालील क्षेत्र घटले, तरी खरीप उत्पादनाला फटका नाही; रब्बीसाठी केंद्राचे 177.72 दशलक्ष टनांचे लक्ष्य

Lucky Zodiac Signs: राहू-केतूची उलटी चाल ठरणार वरदान! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुख, संपत्ती आणि समृद्धी; मिळणार बक्कळ पैसा

Goa Water Crisis: राज्य गंभीर पाणी संकटाच्या दिशेने; सत्तरीतील नद्या सप्टेंबरमध्येच तळाला, 31 टक्के पावसाची तूट

SCROLL FOR NEXT