Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa police: 15 उपनिरीक्षकांसह 183 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Goa police: पोलिस खात्यातील 15 उपनिरीक्षक व 6 सहाय्यक उपनिरीक्षकांसह 183 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे.

दैनिक गोमन्तक

Goa police: पोलिस खात्यातील 15 उपनिरीक्षक व 6 सहाय्यक उपनिरीक्षकांसह 183 पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश जारी करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षापासून एकाच जागी असलेल्यांची ही बदली करण्यात आली आहे. ‘इफ्फी’ नंतर निरीक्षक व उपअधीक्षकांच्याही बदल्यांबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.

उपनिरीक्षक अधिकाऱ्याची कमतरता असलेल्या महिला पोलिस स्थानकात एकाचीही वर्णी लावण्यात आलेली नाही. महिला पोलिस स्थानकात गेल्या काही महिन्यापासून पोलिस निरीक्षक एकहाती कामकाज हाताळत आहेत. या स्थानकातील दोन उपनिरीक्षक रजेवर गेले आहेत.

काही दिवसांपूर्वी एका उपनिरीक्षकाची वर्णी लावली होती, तिनेही येथून इतरत्र बदली करवून घेतली आहे. सध्या या पोलिस स्थानकात एकही उपनिरीक्षक नाही. उपनिरीक्षकाची उणीव असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

महिला पोलिस स्थानक अडचणीत

15 पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यात तीन महिला उपनिरीक्षक आहेत. त्यातील एकाचीही महिला पोलिस स्थानकात बदली करण्यात आलेली नाही. या उलट महिला पोलिस स्थानकात असलेल्या सहाय्यक उपनिरीक्षकाची बदली करण्यात आली आहे.

महिलांसंदर्भात अनेक तक्रारी या महिला पोलिस स्थानकाकडे येत असल्याने त्या हाताळण्याचा अधिकार उपनिरीक्षक व निरीक्षकपदाच्या अधिकाऱ्याला आहे. सध्या एकमेव पोलिस निरीक्षक असल्याने महिला पोलिस स्थानकातील कामकाजावर परिणाम होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT