Goa IAS and IPS Officer Transfer  Dainik Gomantak
गोवा

Goa IAS-IPS Officer Transfer: गोव्यातील 'या' आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या

दिल्लीतील आयएएस अधिकारी संजय गोएल, अंकिता मिश्रा तसेच आयपीएस अक्षत कौशल यांची गोव्यात बदली झाली आहे.

दैनिक गोमन्तक

भारतीय प्रशासकीय सेवेतील आठ आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या गोव्यातून व दिल्लीतून गोव्यात झालेल्या बदल्यांचा आदेश गृह मंत्रालयाने जारी केला. उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे यांची अरुणाचल प्रदेशात, तर आयएएस अधिकारी मायकल डिसोझा यांचे लडाख येथे, ज्योती कुमारी यांची अंदमान-निकोबार, आयपीएस शिवेंदू भूषण यांची मिझोराम तर शेखर प्रभुदेसाई यांची अरुणाचल प्रदेशात बदली झाली आहे.

दिल्लीतील आयएएस अधिकारी संजय गोएल, अंकिता मिश्रा तसेच आयपीएस अक्षत कौशल यांची गोव्यात बदली झाली आहे.

दरम्यान, गेल्यावर्षी जुलै महिन्यात चार आयएएस अधिकऱ्यांची बदली झाली होती. आयएएस अधिकारी संजीत रॉड्रीगीस (2013) यांची अरूणाचल प्रदेश, संजीव गडकर (2013) यांची जम्मू काश्मीर, यतिंद्र मराळकर (2013) यांची लडाख येथे आणि प्रसन्न आचार्य (2016) यांची मिझोरम राज्यात बदली करण्यात आली होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT