Goa Accident Dainik Gomantak
गोवा

बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने गाठले, परदेशातून लग्नासाठी गोव्यात आलेल्या ‘लिओ’चा अपघाती मृत्यू

Foreign return man dies in Goa: उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

Pramod Yadav

मडगाव: सुरावली येथे झालेल्या दुचाकीच्या अपघातात ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सुरावली रेल्वे क्रॉसिंगजवळ सोमवारी (०३ नोव्हेंबर) दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात घडला. परदेशात नोकरीसाठी असणारा हा युवक लग्न करण्यासाठी गोव्यात आला होता.

लिओ फर्नांडिस (वय ३८, रा. पेडा –बाणावली) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. रेल्वे क्रॉसिंगजवळील संरक्षक भिंतीला दुचाकी धडकून त्याचा अपघात झाला. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची दुचाकी भिंतीला धडकली.

यात त्याला गंभीर जखम झाली. उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण, उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, लिओ परदेशात नोकरी करत होता. त्याचे डिसेंबरमध्ये लग्न होते. लग्नासाठी तो गोव्यात आला होता. त्यासाठी त्याने मोठी सुट्टी घेतली होती.

दरम्यान, लिओ बोहल्यावर चढण्यापूर्वीच त्याला काळाने गाठले आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला. कोलवा पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT