Goa Traffic Violation
Goa Traffic Violation Dainik Gomantak
गोवा

Traffic Violation: साडेचार वर्षात गोव्यात परराज्यातील 3,498 वाहनांवर कारवाई, 112 कोटींचा महसूल जमा

Pramod Yadav

Goa Traffic Violation: वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी परराज्यातील 3,498 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील साडे चार वर्षात परराज्यातील आणि स्थानिक वाहनांवरील कारवाईतून एकूण 112 कोटींचा महसूल जमा झाला आहे.

अशी माहिती वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी दिली. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी विचारलेल्या प्रश्नाला गुदिन्हो यांनी उत्तर दिले.

मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 पासून आत्तापर्यंत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी परराज्यातील 3,498 वाहनांवर तर, गोवा नोंदणीच्या 16,658 वाहनांवर कारवाई करण्यात आली. असे एकूण 20,156 वाहनांवर कारवाई करण्यात आली. असे मंत्री माविन यांच्या उत्तरात म्हटले आहे.

गोव्यात येणारे पर्यटक वाहतूक नियमांकडे दुर्लेक्ष करतात, आणि नियमांचे उल्लंघन करतात. त्यामुळे वाहतूक पोलिसांकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाते. असे माविन म्हणाले.

काचांना फिल्मिंग प्रकरणी 1,171 वाहनांवर कारवाई

वाहनांना फिल्मिंग केल्याप्रकरणी 1,171 वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती माविन गुदिन्हो यांनी दिली. एक जानेवारी 2022 ते 30 जून 2023 या दीड वर्षांच्या काळात ही कारवाई करण्यात आली. अशी माहिती माविन गुदिन्हो यांनी दिली. आमदार वीरेश बोरकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला गुदिन्हो यांनी उत्तर दिले.

कारवाई केलेल्या वाहनांमध्ये 70 वाहन मालकांना दोनपेक्षा जास्तवेळा नियम उल्लंघन केला असून, एका वाहन मालकाला तब्बल पाचवेळा दंड ठोठावण्यात आला. असे माविन म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT