फसवेगिरी प्रकरणातील केरळचा वॉन्टेड सापडला गोव्यात, कोकण रेल्वे पोलिसांकडून अटक

मागील अनेक दिवसांपासून केरळ पोलीस आोरपीच्या मागावर होते.
Crime
CrimeDainik gomantak

फसवाफसवीच्या प्रकरणात केरळमध्ये वॉन्टेड असलेल्या आरोपीला कोकण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. गोव्यातील मडगाव येथे फिरत असताना पोलिसांनी संशयिताला अटक केली. मागील अनेक दिवसांपासून केरळ पोलीस आोरपीच्या मागावर होते, अखेर मडगाव येथे त्याला ताब्यात घेण्यात आले.

सुजेश सुरेश थायपराम्बिल (वय 28, रा. एर्नाकुलम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 420, 406 आणि 408 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केरळमधील मत्तांचारी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. पोलिसांनी आरोपीचा फोटो व्हॉट्सअपच्या माध्यामातून गोवा पोलिसांना शेअर केला होता. पोलीस आरोपीचा शोध घेत असताना तो मडगाव रेल्वे स्थानकावर आढळून आला.

कोकण रेल्वेचे मिंगेल वाझ आणि रागेश नाईक पोलीस कर्मचारी ड्यूटीवर असताना, आरोपी सुजेश याला ताब्यात घेण्याता आले.

कोकण पोलिसांकडून आरोपी सुजेश याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com