Goa Fatorda Abandoned Vehicles Dainik Gomantak
गोवा

Fatorda News: फातोर्डात ३१ बेवारस वाहने रडारवर

South Goa: सहा महिन्यांमध्ये कुणीही हक्क न सांगितल्यास होणार लिलाव

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव आणि फातोर्डा परिसरातील ३१ बेवारस वाहनांची नोंद वाहतूक पोलिसांनी केलेली आहे. या वाहनांवर सहा महिन्यांमध्ये कुणीही हक्क न सांगितल्यास लिलाव केला जाईल. यासंदर्भात दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांकडून नोटीस जारी करण्यात आलेली आहे.

दक्षिण गोवा (South Goa) जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी जारी केलेल्या नोटिशीत म्हटले आहे,की बेवारस वाहनांवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे.

दक्षिण गोवा वाहतूक पोलिस उपअधीक्षक प्रबोध शिरवईकर यांनी मडगाव आणि फातोर्डा परिसरात दीर्घ काळापासून बंद अवस्थेत व बेवारस स्थितीत असलेल्या वाहनांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केली आहे.

या बेवारस वाहनांमुळे डासांची पैदास होऊन साथीचे रोग पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे सामान्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्यांच्या बाजूला असणाऱ्या बेवारस वाहनांमुळे जनतेची व वाहतुकीला गैरसोय होत आहे.

काही ठिकाणी पार्किंगच्या जागा अनायासे अडवल्या गेलेल्या आहेत. या वाहनांमुळे सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे.

उपजिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यांसह भेटा

या बेवारस वाहनांवर हक्क सांगितला न गेल्यास लिलाव केला जाणार आहे. या वाहनांवर कुणाचा हक्क किंवा दावा असल्यास त्यांनी सहा महिन्यांच्या आत कागदोपत्री पुराव्यासह उपजिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

सहा महिन्यांनंतर कोणत्याही प्रकारचा दावा मान्य केला जाणार नाही. ही वाहने राज्य सरकारच्या नावे जप्त करून लिलावाद्वारे निकाली काढली जातील. वाहतूक विभागाने नोंद केलेल्या ३१ वाहनांची यादी उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे असल्याचेही सांगण्यात आले.

बेकायदेशीर पार्किंग विरोधात मोहीम सुरू

फातोर्डा परिसरात रस्‍त्‍यावर बेकायदेशीर पार्क करुन ठेवणार्‍या वाहनांच्‍या विरोधात आज मडगाव वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरु केली असून ही मोहीम संपूर्ण मतदारसंघात राबविली जाईल अशी माहिती वाहतूक पोलीस निरीक्षक संजय दळवी यांनी दिली.

रवींद्र भवन सर्कल ते आर्लेम सर्कल पर्यंतच्‍या रस्‍त्‍यावर बेशिस्त पार्क केलेल्‍या वाहनांवर कारवाई करण्‍यात आली. काल आमदार विजय सरदेसाई यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या बेशिस्त पार्किंग विरूद्ध कारवाईचे निर्देेश दिले होते. त्‍यानंतर लगेच ही कारवाई सुरू झाली आहे.

हॉस्पिसियोनजीक ऑटो, टॅक्सी, पायलट स्टँड

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ (हॉस्पिसियो) येथे महामार्गापासून ४० मीटर अंतरावर टी जंक्‍शनवरील मदर मारिया क्लारा रोडच्या दिशेने वाहनतळ निश्चित केला आहे. इस्पितळाच्या संरक्षक भिंतीच्या बाजूने रिक्षा, टॅक्सी स्टँड आणि मोटारसायकल पायलट स्टँडची होणार आहे.

शेवटचा वाहनतळ हा रुग्ण, नातेवाईक व इतर इस्पितळात येणाऱ्यांना राखीव असेल. जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी अधिसूचना जारी केली आहे. साबांखा कार्यकारी अभियंता यांना फलकांची उभारणी करण्यास सांगितलेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मतदार याद्यांच्या कामास नकार, 'AE'ला घेतले ताब्यात; सरकारी ड्युटीवरून नवा वाद!

IND vs AUS: टीम इंडियाचा डबल धमाका; मालिका विजयाच्या दिशेने कूच, सोबतच मोठा वर्ल्ड रेकॉर्ड; 'गोल्ड कोस्ट'वर कांगारुंना पाजलं पराभवाचं पाणी VIDEO

IND vs AUS: यॉर्कर किंगचा 'विराट' रेकॉर्ड! जसप्रीत बुमराह ठरला ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज; सईद अजमलचा मोडला विक्रम

IND vs AUS: चौथ्या टी-20 मध्ये 'सूर्या ब्रिगेड' सरस! भारताचा 48 धावांनी दणदणीत विजय; भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर कांगारु गारद VIDEO

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

SCROLL FOR NEXT