Chorao Ferry Boat Traffic Issue Dainik Gomantak
गोवा

Chorao Ferry Boat: चोडणवासीय 'रो-रो'च्या प्रतिक्षेत! रोजच्या ट्रॅफिकमुळे प्रवासी संतप्त

दैनिक गोमन्तक

Traffic Jam Issue at Chorao-Ribandar ferry boat

चोडण ते रायबंदर या सर्वांत व्यस्त जलमार्गावर गेल्या 15 दिवसांपासून पाच ऐवजी चारच फेरीबोटी सुरू असल्याने दोन्ही बाजूने दुचाकी-चारचाकी वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागत आहेत.

प्रवासी संतप्त झाले असून याबाबत विचारणा केली असता, दररोज एक फेरी ब्रेकडाऊन झाल्याचे कारण दिले जात आहे. अनेकजण या फेरीमधून दररोज प्रवास करत असतात. यामध्ये नोकरदारवर्ग, महिला, विद्यार्थी तसेच ज्येष्ठांचाही समावेश असतो.

नित्याच्याच झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांनी असंतोष व्यक्त केला आहे. आज सकाळी चोडण फेरीधक्क्यावर वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. स्थानिक पंचायत, सरकार या विषयी फेल ठरल्याची प्रतिक्रिया स्थानिकांंनी व्यक्त केली आहे.

माहितीनुसार, चोडण ते रायबंदर या जलमार्गावर रो-रो फेरीबोट सुरू करण्यासाठी आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. याबाबत या प्रकल्पाची फाईल मंजूर झाली असून लवकरच या प्रकल्पासाठी निविदा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Traffic Jam Issue at Chorao-Ribandar ferry boat

फेरीबोटमध्ये जास्तीत जास्त 5 चारचाकी वाहने समाविष्ट होऊ शकतात. त्यामुळे प्रवासी नेहमीच तक्रार करायचे. यामुळे प्रवाशांच्या सोईसाठी आमदारांनी रो-रो फेरीबोट सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर करून घेतला. मात्र अद्याप याला मुहूर्त मिळाला नसल्याने रो-रो नेमकी कधी सुरू होणार?असा सवाल प्रवासी व्यक्त करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2024: गोव्याचे आजपासून मिशन सिक्कीम! मागच्या लढतीतील चुका टाळण्याचे आव्हान

BCCI T20 Tournament: गोवा महिला क्रिकेट संघाची दणदणीत कामगिरी! जम्मू-काश्मीरचा आठ विकेट राखून पराभव

Karnataka: मुरुडेश्वर मंदिरात बॉम्बस्फोट करण्याचा कट उधळला, कर्नाटकात सहा दहशतवाद्यांना अटक

CM Pramod Sawant: राष्ट्रीय प्रवासात 'गोवा' महत्त्वाची भूमिका बजावेल! मुख्यमंत्री सावंतांनी व्यक्त केला विश्वास

Sancoale News: क्विनीनगरात तणाव! 'रस्ता' प्रश्नावरून नागरिक आक्रमक'; आमदार वाझ यांची मध्यस्थी

SCROLL FOR NEXT