Traffic jam  Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात वाहतूक व्यवस्थेचे तीन-तेरा

वाहनचालकांची सतावणूक : पण ‘राव रे, वच रे’ करणाऱ्या बसवाल्यांकडे दुर्लक्ष

दैनिक गोमन्तक

मिलिंद म्हाडगुत

फोंडा : शहरात अनेक ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते. गरजेच्या ठिकाणी सिग्नल नाहीत. तसेच गतिरोधक नसल्यामुळे अपघात होतात. असे असताना वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलिस केवळ तालांव देण्यातच मग्न असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

एखाद्या वळणावर उभे राहिल्यामुळे हे वाहतूक पोलिस दिसत नाहीत. पण शिट्टी वाजवल्यानंतर चालकाची खास करून दुचाकीस्वारांची तारांबळ उडते आणि त्यातून छोटे-मोठे अपघातही घडतात. आधीच शहरात बेफाम वाहतुकीमुळे समस्या निर्माण झाली आहे. त्यात पोलिस रस्त्याच्या मधोमध राहून तालांव देत असल्यामुळे अधिकच कोंडी होताना दिसत आहे.

बागायतदार परिसर हा शहरातील सर्वांत गजबजलेला परिसर. तेथील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याऐवजी पोलिस वाहनचालकांना कसे पकडायचे, याच्या मागे असल्याचे दिसतात. फोंड्यात कोठेही ट्रॅफिक सिग्नल नाही तसेच गतिरोधक नाहीत. त्यामुळे वाहने सुसाट चालवली जातात. विशेष म्हणजे ‘राव रे, वच रे’ करणाऱ्या बसवाल्यांकडे मात्र पोलिस सोयीस्करपणे दुर्लक्ष करताना दिसतात.

बसवाल्यांची मनमानी : जागोजागी थांबत घेतात प्रवासी

वरच्या बाजारात संगम बेकरीशेजारी एकच बस स्टॉप असताना बागायतदार ते संगम बेकरी या पाव किलोमीटरच्या प्रवासात हे बसवाले कमीत कमी चार ते पाच थांबे घेतात, तेही पोलिसांसमोर आणि पोलिस मात्र मूग गिळून गप्प बसलेले दिसतात. हीच गोष्ट मडगाव, सावर्डे, वास्को येथे जाणाऱ्या बसेसची. जुन्या बस थांब्यापासून फोंडा तिस्कापर्यंत या बसेस कमीत कमी पाच थांबे तरी घेतात. त्यामुळे आधीच अनियंत्रित असलेल्या वाहतुकीची अधिकच गोची होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT