Traffic jam in Margao Dainik Gomantak
गोवा

मडगावात वाहतूक कोंडी; पार्किंग तळ रखडला

जुन्या वाहनांचा वाहतुकीला अडथळा

दैनिक गोमन्तक

फातोर्डा: मडगावात पार्किंगची समस्या जटिल बनली असून एका नियोजित ठिकाणी दुचाकी किंवा चारचाकी वाहन उभे करण्यासाठी तीन चार फेऱ्या माराव्या लागतात. गेल्या 7 वर्षांपासून रखडत पडलेल्या बहुमजली वाहन पार्किंग तळाच्या कामाला प्रत्यक्षात सुरवातही झाली नसून वाहनांत मात्र बेसुमार वाढ होत आहे. त्यामुळे मडगाव शहराला वाहन पार्किंगसाठी जागा अपुरी पडत आहे. शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर जुनी भंगार स्थितीतील वाहने उभी करून ठेवल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

पालिका क्षेत्राच्या लोकसंख्येबरोबरच वाहन संख्याही वाढत आहे. याबरोबरच सभोवतीच्या परिसरातील वाहनेही या शहरात दाखल होत आहेत. वाहने वाढली तरी शहरातील रस्ते तितकेच राहिल्याने स्वाभाविक पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंगसाठी जागा मिळत नसल्याने रस्त्यावर कशाही पद्धतीने वाहने उभी केली जात असल्याने जागा व्यापते व वाहतूक कोंडी होते. नागरिकांना वाहने पार्किंग करण्यासाठी नियोजित जागा उपलब्ध नसल्याने सर्वत्र रस्त्यावर होणाऱ्या बेकायदा पार्किंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. रस्त्यांवर नागरिकांना चालणे मुश्कील होऊन बसले असून सगळ्यांनाच त्याचा प्रचंड त्रास होत आहे. स्थानिक प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन या प्रश्नी लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी जोर धरीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT