PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गोवा भेट आणि मडगाव सभा यानिमित्ताने दक्षिण गोव्यातील वाहतुकीवर सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत काही प्रमाणात निर्बंध आणण्यात आले आहेत. नावेली जंक्शन ते बाळ्ळी जंक्शन, चिंचणी जंक्शन ते ओनजीसी बेतूल, बाळ्ळी जंक्शन ते ओएनजीसी बेतूल, केळशी ते ओएनजीसी व्हाया असोळणा पूल, मोबर ओर्ली ते असोळणा चिंचणी या मार्गावर निर्बंध राहतील.
चिंचणी जंक्शन ते ओएनजीसी बेतुल व्हाया असोळणा बाजार, बाळ्ळी जंक्शन - बोमडामळ - दाबे - किटल ते ओएनजीसी, कुंकळ्ळी बसस्थानक ते कुंकळ्ळी भाजप कार्यालय या जागांवर पार्कींग निषिद्ध करण्यात आले आहे.
पोळे चेकनाका ते मडगाव, फोंडा बोरी ते मडगाव, कुठ्ठाळी ते मडगाव या मार्गावरील वाहतुकीवर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात येणार आहेत.
दाबोळी विमानतळावरून जी वाहतूक होणार ती उत्तर गोव्यात आगशी, झुआरी पूल, कूठ्ठाळी जंक्शन, सेंट जासिंतो बेट, चिखली जंक्शन, एअरपोर्ट जंक्शन ते ग्रेड सेपरेटर एअरपोर्टमार्गे वळवली जाणार आहे.
दक्षिण गोव्यात मडगाव फोंडा वाहतूक ईस्टर्न बायपास, आर्लेम सर्कल, राय, बोरी टोलनाका, रासय, ठाणे कुठ्ठाळी, कुठ्ठाळी जंक्शन, सेंट जासिंतो बेट, चिखली जंक्शन, एअरपोर्ट जंक्शन ते ग्रेड सेपरेटर एअरपोर्ट अशी वळविण्यात येणार आहे.
कोलवा ते पणजी वाहतूक ओदेत हॉटेल, सुरावली रस्ता अंडरपास, सुरावली जंक्टन ते वेस्टर्न बायपास यामार्गे वळविण्यात आलेली आहे.
सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत काही रस्त्यांवरील वाहतुकीवर निर्बंध येणार असून त्यात आयएनएस हंसा - बिर्ला रोड ते मडगाव, केसरवाळ मोटेल ते सुरावली जंक्शन, होलसेल मासळी मार्केट ते सुरावली,
अंबाजी जंक्शन ते ओल्ड मार्केट, मडगाव शहर ते ओल्ड मार्केट, मुरिडा आगाळी ते चार रस्ता फातोर्डा, कदंब बसस्थानकामागील जागा ते जॉगर्स पार्कपर्यंत हे निर्बंध लागू राहतील.
आर्ले ते पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम, दामबाब सर्कल ते फॅब इंडिया, एवरिक सिल्वा घर ते बी. एम. सर्व्हिस, न्यायालय ते ओल्ड मार्केट, सुरावली ओव्हरब्रिज ते नुवे मर्जर, जॉगर्स पार्क ते कदंब बसस्थानक, सम्राट गार्डन ते नेहरू स्टेडियम, वुई फॉर फातोर्डा ते जे जे कॉस्ता हॉस्पिटल या जागा पार्किंगसाठी निषिद्ध करण्यात आल्या आहेत.
शहरातील वाहतुकीत बदल
कोलवा ते मडगाव वाहतूक कोलवा, माडेल, आगाळी, बोर्डा, रिंग रोड, कोंब रेल्वे गेट ते नगरपालिका उद्यान, फातोर्डा ते मडगाव वाहतूक मुरीडा, आगळी बोर्डा, होली स्पिरीट, जुने होस्पिसियो ते मडगाव यामार्गे वळविण्यात आली आहे.
‘एसजीपीडीए’ मार्केट आज बंद
सभास्थळाजवळील सर्व दुकाने आणि मार्केट उद्या बंद ठेवण्याचा आदेश दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केला आहे. जिल्हाधिकारी आश्विन चंद्रू यांनी आज एक आदेश जारी करून मडगाव कदंब बसस्थानक परिसरातील मासळी मार्केट, भाजी मार्केट , गाडे आणि इतर आस्थापने बंद ठेवण्यास सांगितले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.