New traffic fines in Goa
पणजी: राज्यात या महिन्यापासून नियम उल्लंघनाची दंडाची रक्कम डिजिटल पेमेंटद्वारे वाहतूक पोलिसांनी स्वीकारण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर नव्याने लागू केलेल्या दंडाची रक्कम पूर्वीपेक्षा दहा पटीने आहे. हा दंड ठोठावण्यास १ मार्चपासून सुरवात झाली आहे. त्यामुळे बेशिस्त वाहन चालकांना चाप बसणार आहे.
मद्यप्राशन केलेल्या चालकाला १० हजार ते १५ हजार रुपये तर हेल्मेट न वापरल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यास सुरवात झाली आहे. मोटार वाहन नियमांचे वारंवार वाहन चालकांकडून उल्लंघन होत असल्याने दंडाची रक्कम १० पटीने वाढवण्यात आली आहे.
पूर्वी मद्यप्राशन केलेला सापडल्यास १ हजार ते १५०० रुपये दंड होता तो आता १० हजार रु. दंड व सहा महिने कैद तसेच दुसऱ्यांदा सापडल्यास १५ हजार रुपये दंड व २ वर्षे कैद अशी शिक्षा आहे.
गाडी चालक वा सहचालकाने सीट बेल्ट न लावल्यास पूर्वी १०० रुपये दंड होता तो आता एक हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. वाहन चालवता मोबाईलवर बोलताना सापडल्यास ५०० रुपये दंड होता तो आता ५ हजार रुपये करण्यात आला आहे.
दुचाकीवर तिघेजण स्वार झालेले आढळल्यास १०० रु. दंड होता तो आता १ हजार रुपये करण्यात आला आहे. वाहन चालवण्याचा परवाना नसलेल्या २०० ते ४०० रुपये दंड दिला जात होता मात्र त्यांना २ हजार रु. दंड व ३ महिने कैद व दुसऱ्यांदा सापडल्यास ४ हजार रु. दंड भरावा लागणार आहे.
प्रदूषण प्रमाणपत्र नसणाऱ्या वाहन चालकांना यापूर्वी १ हजार रुपये दंड दिला जात होता आता तो १० हजार रु. दंड व ६ महिने कैद अशी शिक्षा आहे.
धोकादायकपणे वाहन चालविल्यास ५०० रु. ऐवजी आता नव्याने ५ हजार रुपये दंड आहे.
रुग्णवाहिका या आपत्कालीन वाहनांना जाण्यास वाट करून न दिल्यास १ हजार रुपये दंड होता तो आता १० हजार रुपये करण्यात आला आहे.
सार्वजनिक रस्त्यावर रेसिंग किंवा भरधाववेगाने वाहन चालविल्यास ५०० रुपयांऐवजी ५ हजार रु. दंड भरावा लागणार आहे.
प्रमाणापेक्षा अधिक वजन वाहनात भरल्यास २ हजार ऐवजी आता नव्या दंडाच्या सूचीनुसार २० हजार रुपये दंड तर सिग्नल तोडल्यास ५०० रुपये दंड होता तो आता ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
१८ वर्षाखालील चालकाला वाहन चालविल्यास २५ हजार रुपये दंड तसेच ३ वर्षे कैद, वाहनाचे रजिस्ट्रेशन एक वर्षासाठी रद्द करणे तसेच त्याला २५ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय कायदेशीर वाहन परवाना मिळणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.