Kokan Railway Pernem Tunnel  Dainik Gomantak
गोवा

Kokan Railway: कोकण रेल्वे साडेसात तास ठप्प; रात्री वाहतूक सुरू

Pernem Tunnel: बोगद्यात चिखलमिश्रित पाणी रूळावर आल्याने वाहतूक दुपारी खंडित करण्यात आली

गोमन्तक डिजिटल टीम

कोकण रेल्वे मार्गावरील पेडणे बोगद्यातील रुळांवर चिखलमिश्रित पाणी आल्याने वाहतूक साडेसात तास बंद पडली होती. दुपारी ३ वाजता हा मार्ग बंद झाला होता. रात्री १०.३० वाजता वेरावल एक्सप्रेस पेडणे रेल्वे स्थानकापासून सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाली, अशी माहिती कोकण रेल्वेचे उपसरव्यवस्थापक (जनसंपर्क) बबन घाटगे यांनी आज रात्री ‘गोमन्तक’ला दिली.

पेडणे रेल्वे स्थानकापासून अवघ्या काही मीटरवर असलेल्या बोगद्याने आज पुन्हा कोकण रेल्वेची वाहतूक खंडित केली. याच बोगद्यातील ढासळती माती व झिरपणारे पाणी यांमुळे कोकण रेल्वेचे गोव्यातील आगमन १९९७ मध्ये एक वर्ष लांबणीवर पडले होते.

या बोगद्यातून महाराष्ट्राकडे जाताना रेल्वे रुळांच्या उजवीकडे मोठा झरा गेले दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे उमळला आहे. चिखलमिश्रित पाणी रूळावर आल्याने रेल्वेची वाहतूक दुपारी खंडित करण्यात आली.

सायंकाळच्या वेळेत कार्यालयीन कामासाठी गोव्यात पोचलेले कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक बाळासाहेब निकम हेही कारवारहून गोव्यात पोचले. कामगारांकरवी चिखल उपसून व पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न सुरू होता.

झा यांनी रात्री ९ वाजता ‘गोमन्तक’ला सांगितले की, पाण्याला वाट करून दिली जात आहे. त्यामुळे ते रुळावर येणार नाही. चिखल हटविण्यात येत आहे. पाण्याची पातळी कमी झाली की, रेल्वे वाहतूक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

या गाड्यांना विलंब

या आपत्तीमुळे लोकमान्य टिळक टर्मिनस कोचुवेली एक्सप्रेस रोहा येथे, नेत्रावती एक्सप्रेस चिपळूण, मंगला कणकवली, ऋषिकेश कोचुवेली एक्सप्रेस कुडाळ, जनशताब्दी सावंतवाडी येथे थांबवण्यात आली होती. मडगावहून मुंबईला सायंकाळी सहा वाजता निघणारी कोकण कन्या एक्सप्रेस रात्री १०.३० पर्यंत मडगावातून सुटू शकली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubhanshu Shukla: अंतराळवीर 'शुभांशू शुक्ला' पृथ्वीवर परतणार! हार्मनी मोड्यूलमधून प्रवास होणार सुरु

Ram Temple Film: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Valpoi: देवाक काळजी रे! गवाणे-सत्तरीतील कुटुंबाला मिळणार निवारा; आरोग्यमंत्री राणे बांधून देणार घर

Goa News Live Updates: साखळी रविद्र भवनात कृष्णबट्ट बांदकरांच्या तैलचित्राचे अनावरण

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT