Tourist|Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटन करा मात्र उघड्यावर स्वयंपाक नको...नाहितर भरावा लागेल इतका दंड

गोव्यात उघड्यावर स्वयंपाक केल्यास पर्यटकांना 50 हजारापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: गोव्यात उघड्यावर स्वयंपाक केल्यास पर्यटकांना 50 हजारापर्यंत दंड आकारण्यात येणार आहे. पर्यटन खात्याच्या मंडळाने विविध सल्लादर्शक सूचना जारी केल्या आहेत.

किनारपट्टी भागातील समुद्रकिनाऱ्यावर तसेच मोकळ्या ठिकाणी मद्यपान करणे, समुद्रकिनाऱ्यावर वाहन चालवणे, अंमलीपदार्थाची विक्री करणाऱ्यांकडून ड्रग्ज खरेदी करणे व त्याचे सेवन करणाऱ्यांविरुद्ध कठोरपणे कारवाई केली जाणार आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील शॅक्समध्ये बसून मद्य घेण्यास परवानगी आहे मात्र बाहेर येऊन मद्य घेण्यास बंदी आहे. संशयास्पद असलेल्या ऑनलाईन पोर्टलवरून सेवा आरक्षण करू नये.

फिरण्यासाठी वाहने भाडेपट्टीवर घेताना ती भाडे वाहने म्हणून वाहतूक खात्याकडे नोंदणी केलेले आहे की नाही याची खात्री करावी. जी हॉटेल्स पर्यटन खात्याकडे नोंद आहेत त्यांच्यामध्येच वास्तव्य करावे.

सेल्फी काढताना सावधान

जलक्रीडेसाठी पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यावर असलेल्या दलालाकडे व्यवहार न करता नोंदणीकृत तेथे असलेल्या कार्यालयातूनच त्याची नोंदणी करावी. समुद्रकिनाऱ्यावरील खडकाळ भागात जाऊन सेल्फी किंवा छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न करू नये कारण समुद्रांच्या लाटांमुळे जीवावर बेतू शकते.

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यास वा अस्वच्छता केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असे मंडळाने जारी केलेल्या सल्लादर्शक सूचनेत आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: "आम्ही भारतीय आहोत, आम्हाला चायनीज म्हणू नका!" अरुणाचलच्या चिमुकलीचा व्हिडिओ पाहून पाणावले देशवासीयांचे डोळे

Goa Parra Road: 'डियर जिंदगी रोड'वर पर्यटनाची नवी लाट! आलिया-शाहरुखच्या सायकलिंग दृश्याने पर्रा-माडानी रस्‍त्‍याला देशभरात ओळख

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बुध, गुरु आणि मंगळाची महायुती! 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठा ट्विस्ट; हाती लागणार कुबेराचा खजिना

Chief Election Commissioner: मुख्य निवडणूक आयुक्त येणार गोव्यात, 2 व 3 सप्टेंबरला दौरा; निवडणुकीच्या दृष्टीने अधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन

न्यू यॉर्कच्या सिप्रियानी वॉल स्ट्रीटवर भारतीय संस्कृतीचा डंका! 'भारत बियॉन्ड बॉर्डर 2.0' गाला संपन्न; सिनेकलाकारांची विशेष उपस्थिती

SCROLL FOR NEXT