Tourists Ban on Dudhsagar Falls: Dainik Gomantak
गोवा

Tourists Ban on Dudhsagar Falls: दुधसागर धबधब्यावर पर्यटक, ट्रेकर्सना बंदी; दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कुळे, कॅसल रॉक, सोनावली, करंझोळ या चारही ठिकाणी चेक पोस्ट

Akshay Nirmale

Tourists, Trekkers Ban on Dudhsagar Falls: गोव्यात गेल्या काही काळात धबधब्यांमध्ये पर्यटक वाहून गेल्याच्या, मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या. तसेच रेल्वे ट्रॅकवरून ट्रेकिंगसाठी येथे ट्रेकर्स येत असतात. गेल्या रविवारी असेच अनेक ट्रेकर्स येथे येऊन अडकून पडले होते. कारण त्यांना परवानगीच दिली गेली नाही.

या सर्व पार्श्वभुमीवर येथे कोणतीही दुर्घटना घडू नये, या करिता आता दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दुधसागर धबधब्यावर पर्यटकांना बंदी केली आहे. दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू हे जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे चेअरमनदेखील आहेत. याबाबतच्या परित्रपकात काय म्हटले आहे जाणून घेऊया.

  1. दुधसागर धबधबा, दुधसागर रेल्वे स्टेशन, दुधसागर धबधब्याजवळील रेल्वे पूल येथे पर्यटक, ट्रेकर्स आणि इतरांना पुर्णतः बंदी असेल. पोलिस, रेल्वे कर्मचारी, वन कर्मचारी आणि ड्युटीवर असलेल्या सरकारी अधिकाऱ्यांशिवाय येथे कुणालाही जाता येणार नाही.

  2. तथापि, दुधसागर धबधब्याच्या पायथ्याच्या बाजूला निश्चित्त केलेल्या मार्गावरून जायला परवानगी असेल. भेट देणाऱ्यांना वन विभागाचे नियमांचे पालन करावे लागेल. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळावे लागतील.

  3. कुळे, कॅसल रॉक, सोनावली, करंझोळ या चारही ठिकाणी चेक पोस्ट उभारले जातील. येथे पोलिस, रेल्वे पोलिस, वन कर्मचारी असतील. येथून प्रवेश बंद असेल. या चारही ठिकाणी दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे सीसीटीव्ही लावले जातील. त्याद्वारेही निगराणी ठेवली जाईल.

  4. दक्षिण पश्चिम रेल्वेतर्फे बॅरीकेडिंग केले जाईल. तसेच धबधब्यावर बंदीबाबत इंग्रजी, मराठी, कोकणी, कन्नड, हिंदी भाषेत फलक लावले जातील.

  5. वरील नियमांचा भंग केल्यास किंवा कर्मचारी, अधिकारी यांच्याशी हुज्जत घातल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल.

दक्षिण पश्चिम रेल्वे हुबळी कार्यालय, हुबळी रेल्वे पोलिस, वन्यजीव रक्षक फोंडा, कुळे पोलिस स्टेशन, सहाय्यक वनरक्षक उत्तर गोवा, गेडाचे सचिव आणि सदस्य यांना जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

Imran Khan PTI Protest: 'इम्रान खानला सोडा, नाहीतर..', शाहबाज शरीफ सरकारविरुद्ध आरपारची लढाई; 2000 पीटीआय कार्यकर्त्यांना अटक

Trigrahi Yog 2026: सूर्य, बुध आणि शुक्राचा महासंगम! 17 अक्टोबरपासून सुरु होणार 'या' राशींचा सुवर्णकाळ; जबरदस्त धनलाभाचा योग

SCROLL FOR NEXT