चोर्ला: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक.  Dainik Gomantak
गोवा

मद्यधुंद अवस्थेत चोर्ला घाटात पर्यटकांची हुल्लडबाजी

सात वर्षांपूर्वी चोर्ला येथे गणेशचतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या महिलेवर दोघा पर्यटकांनी अत्याचार करून दागिणे लांबविले होते.

Chetan Lakkaibailkar

पणजी: निसर्गाने ओंजळभरून आविष्कार केलेल्या चोर्ला घाटातील (Chorla Ghat) निसर्गाला बहर आला आहे. हिरवीगार दुलई ल्यालेले नयनरम्य डोंगर-दऱ्या आणि फेसाळत धबाधब कोसळणारे जलप्रपात पाहण्यासाठी पर्यटकांची (Tourist) गर्दी होत आहे. मात्र, गोव्यातून (Goa) कर्नाटकात (Karnataka) जाणाऱ्या मद्यधुंद पर्यटकांमुळे प्रवासी आणि स्थानिकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे.

चोर्ला घाट म्हणजे सर्वकालीन पर्यटनाचा जणू नजराणाच. मात्र, अलिकडे या घाटाला जणू नजर लागल्यासारखी स्थिती आहे. चोर्ला गावाचा नाका ते केरीपर्यंत अनेक धबधबे फेसाळताना दिसतात. हल्‍ली हे धबधबे पर्यटकांना अधिकच आकर्षित करीत आहेत. विशेषतः गोवा-कर्नाटक हद्दीवरील चोर्ला घाट, केरी डॅमचा मनमोहक परिसर आणि लाकडीचा धबधबा तसेच महाराष्ट्रातून गोव्याशी नाते सांगणाऱ्या सह्याद्रीच्या कड्या-कपा-या पर्यटकांना भुलवित आहेत.

चोर्ला: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक.

कोविडच्या महामारीत देखील परप्रांतीय पर्यटक राज्यात दाखल होत आहेत. हे पर्यटक चोर्लामार्गे कर्नाटकात जातांना मद्यधुंद अवस्थेत चोर्ला घाटातील अरूंद रस्त्यांवर धिंगाणा घालताना दिसत आहेत. सध्या घाटात मोठ्या प्रमाणात धुके आहे. त्यामुळे आधीच चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. त्यात मद्यधुंद पर्यटक हुल्लडबाजी करीत असतात. त्यामुळे अनेकवेळा सहकुटुंब प्रवास करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. हुल्लडबाजी करणाऱ्यांना आवरण्याची मागणी प्रवासी आणि स्थानिकांतून होत आहे.

पोलिस चौकी हवी

चोर्ला घाटात गुन्हेगारी वाढली आहे. सात वर्षांपूर्वी चोर्ला येथे गणेशचतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या महिलेवर दोघा पर्यटकांनी अत्याचार करून दागिणे लांबविले होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री पार्सेकर यांनी चोर्ला घाटात पावसाळी पर्यटन काळात दरवर्षी बंदोबस्त ठेवायला सुरवात केली होती. सध्या असा बंदोबस्त नसल्यामुळे मद्यधुंद पर्यटक बेफाम झाले आहेत. चोर्ला घाटातील गुन्हेगारी रोखण्यासाठी गोवा आणि कर्नाटकाने संयुक्तपणे कार्यवाही हाती घेण्याची गरज आहे. त्याशिवाय कायमस्वरूपी पोलिस चौकी उभारण्याची आवश्‍यकता असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.

चोर्ला: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक.

महाराष्ट्रातून ‘नो एन्ट्री’

विविध राज्यातील पर्यटकांना महाराष्‍ट्रात प्रवेशबंदी आहे. त्यामुळे बहुतेक पर्यटक गोव्यात येत आहेत. ते महाराष्ट्रात जाण्याऐवजी चोर्ला घाटमार्गे जात आहेत. मात्र ‘गोंयचो सोरो’ पिऊन हे पर्यटक घाटात अनावश्‍यक दंगामस्ती करीत असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे. विशेषतः दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दापत्यांना याचा अधिक त्रास होत आहे.

चोर्ला: मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर हुल्लडबाजी करणारे पर्यटक.

"पर्यटक राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देतात. त्यामुळे राज्याचा विकास शक्य आहे हे मान्य आहे, पण घाटातील पर्यटकांची हुल्लडबाजी प्रवासी आणि स्थानिकांच्या जीवावर बेतत आहे. सरकारने चोर्ला घाटातील या हुल्लडबाजीकडे लक्ष द्यायला हवे."

- परमेश गावकर, केरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT