Alco-Tourism Dainik Gomantak
गोवा

Alco-Tourism: गोव्यात बिअरची कॉलर 'टाईट', देशी 'फेनी'कडे पर्यटकांची पाठ; व्हिस्कीचा नंबर दुसरा

फार कमी लोक फेनी पिण्यास प्राधान्य देतात असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

Pramod Yadav

गोव्यात येणारे पर्यटक भटकंतीसह मद्य घेत असतात. एका सर्वेक्षणातून समोर आलेल्या माहितीनुसार, गोव्यातील पर्यटक व्हिस्कीपेक्षा बिअर पिण्यास जास्त प्राधान्य देतात.

तसेच, गोव्याचे स्थानिक उत्पादन असलेल्या 'फेनी'कडे (Goan Feni) पर्यटकांनी पाठ फिरवल्याचे देखील समोर आले असून, फार कमी लोक फेनी पिण्यास प्राधान्य देतात असे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

(Tourists in Goa prefer drinking beer over whiskey)

व्हीएम साळगावकर इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल हॉस्पिटॅलिटी एज्युकेशन आणि गोवा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एडगर डिसोझा यांनी 'अल्को-टुरिझम' (Alco-Tourism) या विषयावर अभ्यास केला आहे. पर्यटकांनी बिअर पिण्यास सर्वाधिक पसंती दिली आहे. 29 टक्के पर्यटकांनी बिअर तर, 23 टक्के पर्यटकांनी व्हिस्की पिण्यास प्राधान्य दिले आहे.

तसेच, 28 टक्के लोकांनी रेस्टॉरंट्स, 19 टक्के लोकांनी पब किंवा टॅव्हर तर, 17 टक्के लोकांनी बीच शॅकला पसंतीचे ठिकाण म्हणून निवडले आहे. असेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

दरम्यान, गोव्याचे देशी अल्कोहोलिक पेय असलेल्या फेनीला (काजू किंवा नारळ) पर्यटकांनी फारसे पसंत केले नाही. केवळ दोन टक्के पर्यटकांनी फेनीला पसंती दिली आहे. याशिवाय वाइन (11%), वोडका (10%) आणि रम (9%) लोकांनी पसंत केली आहे.

पुरुष आणि महिला या प्रमाणात पुरुष पर्यटकांमध्ये व्हिस्की (37.9%), त्यानंतर बिअर (29.1%) आणि रम (9.4%), तर महिला पर्यटकांनी बिअर (28.6%), वाइन (20.4%) आणि जिन (13.8%) पिण्यास प्राधान्य दिले. असे या सर्वेक्षणातून समोर आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT