Goa Beach  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील समुद्र किनाऱ्यांवर 'व्हॅलेंटाईन डे'ची धूम

दिवसभर पर्यटकांची वर्दळ असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर संध्याकाळी स्थानिकांची रेलचेल होती.

दैनिक गोमन्तक

मरगाव: व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी सोमवारी पर्यटकांनी बाणावली आणि कोलवा समुद्र किनाऱ्यांना भेट दिली. पर्यटकांनी समुद्रात खेळण्याचा आणि वाळूवर फेरफटका मारण्याचा आनंद लुटला, तर स्थानिकांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला.

दिवसभर पर्यटकांची (Tourist) वर्दळ असलेल्या समुद्र किनाऱ्यांवर संध्याकाळी स्थानिकांची रेलचेल होती. समुद्रकिनार्‍यांवरील शॅक आणि रेस्टॉरंट्स लाल फुलांनी सजवली होती. अनेक लोक मतदान करून व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी घराबाहेर पडले होते.

व्हॅलेंटाईन डेच्या (Valentine's Day) निमित्ताने काही विदेशी पर्यटकांनी देखील गोव्याला भेट दिली. या महिन्याच्या अखेरीस राज्यात साजरा होणार्‍या कार्निव्हलसाठी पर्यटक राज्यात येतील अशी अपेक्षा आहे.

सोमवारी गोव्यात विधानसभा निवडणुकीचे (Goa Assembly Election) मतदान पार पडले. रणरणत्या उन्हात रांगेत उभे राहून मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात काल 78.94% मतदान झाले. मतदानानंतर सर्वांना आता निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र, त्यासाठी 10 मार्च पर्यंत थांबावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Casino: गोव्यातील कॅसिनोंमध्ये 21 वर्षांखालील तरुणांना प्रवेशबंदी; कडक परवाना आणि 18% व्याजाची दंडात्मक कारवाई

पर्यटकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही! हणजूण, वागातोर आणि म्हापशात 'FDA'ची धडक मोहीम; अस्वच्छता आढळल्याने तीन दुकाने तात्काळ सील

Goa Bench: जन्मठेपेवरून थेट निर्दोष मुक्तता; मडगावातील दुहेरी खून प्रकरणी, सत्र न्यायालयाचा निकाल गोवा खंडपीठाने बदलला

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

SCROLL FOR NEXT