Goa Tourism Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: पर्यटन सफारींसाठी खास सुरू केलेली ‘हॉप ऑन’ची पर्यटकांना भुरळ

Goa Tourism: बस सेवा देशी तसेच विदेश पर्यटकांच्या पसंतीस पडू लागली आहे. स्वस्त असल्याने पर्यटक या सेवेकडे आकर्षित होत आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa Tourism: पर्यटन सफारींसाठी खास सुरू केलेली हॉप ऑन हॉप ऑफ (होहो) बस सेवा देशी तसेच विदेश पर्यटकांच्या पसंतीस पडू लागली आहे. स्वस्त असल्याने पर्यटक या सेवेकडे आकर्षित होत आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. होहो बस सेवेचे वरिष्ठ प्रतिनिधी बिमल सिंघा यांनी सांगितले की, काही महिन्यांपासून होहो बस सेवेत सुधार झाला असून, देशी तसेच, विदेशातून गोवा फिरायला आलेले पर्यटक आमच्या बस सेवेला प्राधान्य देत आहेत. सध्या तीन होहो बसेस सेवा देत आहेत.

या बसेस रोज तीन ते चार फेऱ्या उत्तर गोव्यातील प्रेक्षणीय स्थळांवर मारतात. यात पर्यटकांना उघड्या बसमधून वरून गोव्याचे सौंदर्य पाहायला मिळते. परत या बसेसमध्ये टेलिव्हिजन आणि संगीतही असते. प्रवासा दरम्यान, गोव्याविषयी माहिती देणारे अनेक व्हिडीओ या बसमध्ये चालवले जातात, असे सिंघा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

NSUI: बालरथांचे 'सुरक्षा ऑडिट' करावे! 'एनएसयूआय' आक्रमक, विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ नको

Panaji: महापालिकेचा माणुसकीचा हात! बेघर आणि भिकाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी सुरू केली विशेष हेल्पलाईन

Goa Congress: कॅसिनोशी जोडलेल्या अवैध 'स्पा'ना संरक्षण कोणाचे? पणजीत 40 हून अधिक अवैध 'स्पा'- प्रतीक्षा खलप

Goa E20 Petrol: गोव्यात 'ई-20' पेट्रोलविरोधात 'आप' आक्रमक! इंधन निवडण्याचा अधिकार वाहनधारकांना देण्याची वाल्मिकी नाईक यांची मागणी

Goa Congress: गोव्यात काँग्रेस ॲक्शन मोडमध्ये! विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'गोवा रक्षण यात्रा'द्वारे जनसंपर्क अभियानावर मोठा भर

SCROLL FOR NEXT