Tourists Accident in Goa Dainik Gomantak
गोवा

Tourists Accident: राज्यात रेंट-अ-कार बुक करून पर्यटकांचा बेशिस्तपणा! मागील पाच वर्षांत 317 अपघात

राज्यात पर्यटकांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

Kavya Powar

Tourists Accident in Goa: राज्यात पर्यटकांच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये पर्यटकांचा बेशिस्तपणा हा मुद्दा अधोरेखित होत आहे. गोव्यात येऊन पर्यटक रेंटच्या कार बुक करून मद्य पिऊन गाडी चालवतात यामुळे अपघातांना आमंत्रण मिळते. ते स्वत: गाड्या चालवत असल्यामुळे पर्यटकांच्या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचा मुद्दा विधानसभेच्या अधिवेशनात मांडण्यात आला.

एका महिला पर्यटकाने पर्रा रस्त्यावर टॉपलेस गाडी चालवणे, पुरुष पर्यटकांचा एक गट दरवाजे उघडे ठेवून गाडी चालवणे, रहदारीच्या रस्त्यावर स्टंटबाजी करणे आणि समुद्रकिनाऱ्यांवर कार चालवणे अशा घटनांमुळे गोव्याची जागतिक पातळीवर प्रतिमा खराब होत आहे. यावरून वाहतुकीचे नियम ठोस नसल्याचा वाद विधानसभेत सुरू झाला.

अशा घटनांमध्ये, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काहींची ओळख पटवून दंड आकारला जातो, तर काहीजण मात्र पोलिसांच्या कारवाईतून सुटतात.

सभागृहात आमदार विजय सरदेसाई आणि आमदार वीरेश बोरकर यांना उत्तर देताना परिवहन मंत्री माविन गुदिन्हो म्हणाले की, अशाच एका घटनेत गाडी चालवणाऱ्या पर्यटकांची ओळख पटवून त्यांना शोधून काढण्यात आले, त्यानंतर त्याच्याकडून 22,500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

अशा अनेक घटनांमुळे अपघात वाढल्याचे पोलिसांनी सांगितले. 2018 ते 2022 पर्यंत एकूण 317 रेंट-अ-कारचे अपघात झाले आहेत. 2018 मध्ये 72 अपघात, त्यानंतर 2019 मध्ये 56, 2020 मध्ये 43, 2021 मध्ये 70 आणि 2022 मध्ये 76 अपघातांची नोंद झाल्यामुळे ही संख्या वाढली आहे.

दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाते, असा दावाही सरकारने केला आहे. 2022 पासून जून 2023 पर्यंत, एकूण 2046 उल्लंघन केल्याची प्रकरणे आढळून आली आहेत आणि 1512 ड्रायव्हिंग परवाने निलंबनासाठी प्राधिकरणाकडे पाठविण्यात आली असून 1667 वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

IFFI मध्ये Goan Director's Cut चे आकर्षण! सगळ्या गोमंतकीय सिनेमांची माहिती घ्या एका क्लिकमध्ये

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

SCROLL FOR NEXT