Sanguem Car Accident: सांगे अपघातातील पतीचा मृतदेह हाती; कार नदीत कोसळून पत्नी, दोन वर्षाच्या मुलाचा झालेला अंत

पुलावरून उगे नदीत कोसळली कार
Sanguem Car Accident:
Sanguem Car Accident: Dainik Gomantak
Published on
Updated on

Sanguem Car Accident : कुमयामळ-सांगे येथील नाईक कुटूंबियांचा पुलावरून कार नदीत कोसळून दुर्दैवी अंत झाल्याची घटना सोमवारी रात्री घडली. या अपघातातील रेखा नाईक (वय 32) आणि दोन वर्षीय दिव्यांश नाईक यांचा यांचे मृतदेह सापडले होते.

पण रेखा यांचे पती मिलिंद नाईक (वय 38) यांचा मृतदेह आढळून आला नव्हता. दरम्यान, मिलिंद नाईक यांचा मृतदेह अग्निशमन दलाला आज, मंगळवारी आढळून आला.

Sanguem Car Accident:
Shrungi Bandekar: गोव्याची जलतरणपटू श्रुंगी बांदेकरच्या शिरपेचात मानाचा तुरा; चीनमधील स्पर्धेत करणार देशाचे नेतृत्व

तारीपांटो - सांगे येथील पुलावरून जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने कार पुलावरून थेट उगे नदीत कोसळून हा अपघात झाला होता. दोन तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी कार नदीतून बाहेर काढली आणि कारच्या काचा फोडून मायलेकाचे मृतदेह बाहेर काढले होते. हे नाईक कुटुंबीय (जीए - 01 - आर - 9158) कारने सांगे बाजाराकडे येत होते.

या पुलाला संरक्षक कठडे नसल्याने कार थेट नदीत कोसळली. यापुर्वीही येथे अशा घटना घडल्या आहेत. स्थानिकांनी वारंवार मागणी करूनही या पुलावर कठडे बांधलेले नाहीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com