Siolim Accident Dainik Gomantak
गोवा

Siolim Accident: शिवोलीत अचानक गाय आडवी आल्यामुळे पर्यटकाची कार उलटली, सुदैवाने जीवितहानी टळली

Goa Accident: शिवोली-मार्णा मार्गावर गुरुवारी (८ मे) सकाळच्या सुमारास एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. एका पर्यटकांच्या वाहनाचा अपघात रस्त्याच्या मधोमध अचानक आलेल्या गायीमुळे घडला.

Sameer Amunekar

शिवोली: शिवोली-मार्णा मार्गावर गुरुवारी (८ मे) सकाळच्या सुमारास एक अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. एका पर्यटकांच्या वाहनाचा अपघात रस्त्याच्या मधोमध अचानक आलेल्या गायीमुळे घडला. अपघातात वाहन उलटले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, पर्यटक वाहन चालक शिवोली-मार्णा येथून जात असताना एक गाय अचानक रस्त्याच्या मधोमध आली. गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात वाहनावरचे नियंत्रण सुटले आणि अपघात घडला. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेमुळे स्थानिक नागरिकांत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर भटक्या जनावरांचा वावर नेहमीच जाणवतो. त्यामुळे प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. शिवोली-मार्ना मार्ग हा वाहतुकीसाठी एक महत्त्वाचा आहे. या मार्गावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज! 18,000 रुपयांचे बेसिक थेट 72,000 रुपये होणार? फिटमेंट फॅक्टरसह समजून घ्या हे 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे

Thailand Heavy Rainfall: पूराच्या पाण्यात बुडाले बँकॉक, 7 लाख नागरिक प्रभावित, रस्त्यांवर सापांचा वावर; थायलंडमध्ये मुसळधार पावसाचा हाहाकार VIDEO

Teachers Salary Issue: 'त्या' 3 हजार शिक्षिकांना वेतनवाढ कधी? अमित पाटकर आक्रमक; सरकारला 8 दिवसांची मुदत

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

'SIR'च्या मुद्द्यावरुन भाजपचा काँग्रेसवर हल्लाबोल; यतिश नाईक म्हणाले, 'हा तर संविधानिक संस्थांवर हल्ला’

SCROLL FOR NEXT