Panaji Viral Video Dainik Gomantak
गोवा

Panaji Viral Video: हम नहीं सुधरेंगे! रेन्ट कारच्या बोनेटवर पर्यटकाचा डान्स, कॅसिनोपुढे रंगला ड्रामा

राजधानी पणजीत कॅसिनोपुढेच रेन्ट कारच्या बोनेटवर एक पर्यटक डान्स करत असल्याची घटना समोर आली आहे.

Pramod Yadav

Panaji Viral Video: काही दिवसांपूर्वी गोव्यातील एका ठिकाणी काही पर्यटक रेन्ट कारच्या छतावर चढून डान्स करत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर आता राजधानी पणजीत कॅसिनोपुढेच रेन्ट कारच्या बोनेटवर एक पर्यटक डान्स करत असल्याची घटना समोर आली आहे.

राजधानी पणजीत प्रवेश केल्यानंतर मांडवीच्या किनारी असलेले कॅसिनो स्वागत करतात. कॅसिनो राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानले जातात. रात्रीच्या वेळी या भागात मोठी गर्दी पाहायला मिळते. दरम्यान, याच कॅसिनो पुढे मंगळवारी रात्री एक पर्यटक कारच्या बोनेटवर डान्स करताना आढळून आला.

विशेष म्हणजे ही कार देखील भाडे तत्वावर घेतल्याचे दिसून येते. व्हिडिओत हा पर्यटक रेन्ट कारच्या बोनेटवर जोर जोरात नाचताना दिसत आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील दोन पर्यटक रेन्ट कारच्या छतावर गाण्याच्या ठेक्यावर नाचत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. तसेच, काही पर्यटक कारवर बसून धोकादायक पद्घतीने स्टंट करताना देखील आढळून आले आहेत. पोलिसांनी तसेच, प्रशासनाने वारंवार सूचना देऊन देखील पर्यटक अशा पद्धतीने स्टंट करत असतात.

त्यामुळे गोव्यात पर्यटनाच्या नावाखाली हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकांना आळा कोण घालणार? असा प्रश्न सध्या स्थानिक उपस्थित करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT