Goa Tourist Sandip Desai
गोवा

गोव्यामध्ये देशी पर्यटकांचे पावसात समुद्रस्‍नान

ऑनलाईन बुकिंगमध्ये वाढ : पर्यटनवाढीसाठी खाते सज्ज

दैनिक गोमन्तक

पणजी : पावसाळा सुरू होताच एरवी शांत दिसणाऱ्या उत्तर गोव्‍यातील काही किनाऱ्यांवर देशी पर्यटकांची बऱ्यापैकी गर्दी दिसत होती. विकेंडमुळे गेली दोन दिवस पर्यटकांची रेलचेल दिसत आहे. कालपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. मात्र, विकेंड गोव्‍यात साजरा करण्यासाठी अगोदरच ऑललाईन बुकिंग केलेल्या पर्यटकांनी गोवा सहल रद्द न करता पावसाळी पर्यटनाचा आनंद घेतला.

राज्‍यातील पर्यटन हंगाम बारमाही सुरू राहावा यासाठी पर्यटन खात्‍याने महत्त्वाची पावले उचलली असून, देशी पर्यटकांनी पावसाळी पर्यटनासाठी गोव्‍यात यावे याचा कृती आराखडा तयारा केला असल्‍याची माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पर्यटन आराखड्यानुसार, खात्‍याने काम सुरू केले असल्‍याचेही मंत्री खंवटे यांनी सांगितले. एरवी पावसाळा सुरू झाला की राज्‍यातील बहुतांश किनारे ओस पडतात. उत्तर गोव्‍यातील कळंगुट, बागा, हरमल, मोरजी आणि दक्षिण गोव्‍यातील कोलवा, पाळोळे, मोबोर असे काही मोजके किनारे वगळता इतर किनाऱ्यांवर भयाण शांतता पसरलेली असते. पण आज कळंगुट, सिकेरी आणि बागा किनाऱ्यांवर काही पर्यटक भर पावसात समुद्रस्‍नानाचा आनंद घेताना दिसत होते.

किनाऱ्यावरील शॅक बंद झाले असले तरी किनारी भागातील रेस्‍टॉरंट, हॉटेल्‍स सुरू आहेत. सध्या ऑनलाईन बुकिंग करून राज्‍यात येणाऱ्या पर्यटकांत बऱ्यापैकी वाढ झाली असल्याचे कळंगुट येथील हॉटेल चालक डेस्‍मंड डिसोझा यांनी सांगितले. काही हॉटेल्‍सचालकांनी पावसाळी हंगामात गोव्‍यात येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध आकर्षक योजना (पॅकेज) तयार केल्‍या असून कमीत-कमी बजेटमध्ये सुंदर पर्यटन, अशा जाहिराती विविध माध्यमातून प्रसारित केल्या जात आहेत. पर्यटन खात्याने पावसाळी पर्यटन वाढण्यासाठी कंबर कसली असून, त्या दिशेने कार्यवाही सुरू झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT