Viral Video | Vagator Beach Dainik Gomantak
गोवा

Viral Video : वागातोर किनाऱ्यावर पर्यटकांची फ्रीस्टाईल हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

वागातोर किनाऱ्यावर पर्यटकांची फ्रीस्टाईल हाणामारी कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या याच भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vagator beach : डिसेंबर सुरु होताच गोव्यात पर्यटन हंगामामुळे पर्यटकांची मोठी गर्दी ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे. गोव्यातील जवळपास सर्वच किनारे पर्यटकांनी फुलून गेले आहेत. यातच काल मंगळवारी रात्री काही पर्यटकांमधील भांडण गोव्यात सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. दोन गटांमधील भांडणात महिला पर्यटकांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी तुडवलं. वागातोर किनाऱ्यावर पर्यटकांची फ्रीस्टाईल हाणामारी कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या याच भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोव्यातील किनाऱ्यांवर सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी जमलेली असते. उत्तर गोव्यातील वागातोर, हणजूण, बागा या किनाऱ्यांना पर्यटक सर्वाधिक पसंती देतात. यातच मंगळवारी रात्री काही पर्यटकांमध्ये क्षुल्लक कारणावरुन भांडण झालं. या भांडणाचं पर्यावसात थेट हाणामारीत झालं. पर्यटक महिला एकमेकींना भिडल्याने काहीकाळ सर्वांच्याच नजरा या भांडणाकडे वळाल्या होत्या. मग काय अनेकांनी आपला फोन उचलत हा सर्व प्रकार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.

काही लोकांनी या भांडणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. एका रात्रीत हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. पर्यटकांमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला याची माहिती नसली तरी वागातोर बीचवरील या भांडणाची मात्र सध्या गोव्यात चांगलीच चर्चा सुरु आहे.

दरम्यान गोव्यात बीचवर पर्यटकांकडून नेहमीच हुल्लडबाजी केली जात असते. काही दिवसांपूर्वी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पर्यटकांनी आपली कार थेट किनाऱ्यावर नेल्यामुळे ते प्रकरण चर्चेत आलं होतं. या सर्व घटनांमध्ये पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोपही सातत्याने होऊ लागला आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतरही उत्तर गोव्यातील किनाऱ्यांवर संगीत रजनी सुरुच असून रात्रभर कर्णकर्कश्श आवाजात गाणी लावली जातात. मात्र या सगळ्या हॉटेल्सवर पोलीस कारवाई करत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT