Goa Accident Dainik Gomantak
गोवा

Goa Accident : गोव्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांच्या कारला भीषण अपघात; चौघे गंभीर

आंध्रप्रदेशमधून स्विफ्ट कार घेऊन गोवा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला गोव्यात प्रवेश करण्याआधीच अपघात झाला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Accident : गोव्यात सध्या पर्यटन हंगाम सुरु झालेला आहे. यातच गोव्यात येणाऱ्या वाहनांमध्येही कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या वाहनांसोबत गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यातच आज गोव्यात फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा गाडीला गोवा-बेळगाव महामार्गावर तिनई घाटात अपघात झाला आहे. या स्वयंअपघातात चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आंध्रप्रदेशमधून स्विफ्ट कार घेऊन गोवा पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या गाडीला गोव्यात प्रवेश करण्याआधीच अपघात झाला आहे. अपघातात राघवेंद्र रेड्डी वय 45, रेणुगोपाळ रेड्डी वय 46, नवीन रेड्डी वय 33 आणि नरसिंहा गौडा वय 35 गंभीर जखमी झाले आहेत. रस्त्याच्या कडेला असलेल्या कठड्याला पहाटे कारची जोरदार धडक बसल्याने हा अपघात झाला आहे. सर्व जखमींना 108 रुग्णवाहिकेतून रामनगर येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी नेण्यात आलं. यानंतर अधिक उपचारासाठी हुबळी येथे दाखल करण्यात आले.

हे पर्यटक रात्रभर प्रवास करत होते. मात्र पहाटेच्या वेळी चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याच ठिकाणी याआधीही आठ गंभीर अपघात झालेले आहे. धोकादायक असलेल्या या घाटात कोणत्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT