Goa: गोव्यातील कॅसिनोचे जहाज  Dainik Gomantak
गोवा

पर्यटकांचे आकर्षण गोव्यातील कॅसिनो

कॅसिनोला 'श्रीमंत लोकांचा जुगार' असेही समजले जाते.

Dainik Gomantak

Goa: पर्यटनाच्या दृष्टीने गोव्याला (Goa Tourism) अनन्यसाधारण महत्त्व आहे, कारण दरवर्षी लाखो पर्यटक 'गोवा दर्शन' (Goa Tour) करण्यासाठी गोमंत भूमीत येतात व मौज-मजा करतात. स्वच्छ समुद्र किनारे व स्वर्गीय निसर्ग सौन्दर्य (Heavenly nature beauty) लाभलेल्या गोव्याचा अनुभव घेतात, परंतु गोव्यात निसर्गसौंदर्य शिवाय अनेक गोष्टी आहेत जिथे पर्यटक मौज-मजा घेतात, त्यातीलच एक गोष्ट म्हणजे गोव्यातील कॅसिनो (Casino).

Casino

थोडक्यात सांगायचे झाले तर आपण कॅसिनोला 'श्रीमंत लोकांचा जुगार' असे म्हणू शकतो, त्याला कारणही तसेच आहे. गोव्याची राजधानी असलेले पणजी शहराला लागून वाहणाऱ्या मांडवी नदी (Mandovi River) मध्ये स्थापन केलेल्या जहाजमध्ये अनेक कॅसिनो उभारलेले आहेत व कॅसिनोचा हा व्यवसाय रोज संध्याकाळ पासून सुरु होऊन रात्रभर चालू असतो. कॅसिनो वर सर्व प्रकारच्या आलिशान अश्या सोयी-सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. कारण तसा पैसाही कॅसिनो मध्ये उधळला जातो. दर दिवशी लाखो-करोडोंची उलाढाल कॅसिनो मध्ये होत असते. याच कॅसिनोंमध्ये रंकाचे राव व रावाचे रंक देखील होतात.

गोव्यात ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी साधारणतः पर्यटन हंगाम म्हणून समजला जातो. कारण या काळात गोव्याचे पर्यटन फुललेले पाहायला मिळते. मात्र कॅसिनो व्यवसायाचा विचार करता कॅसिनो वर्षाचे बाराही महिने दररोज चालू असतात. गोव्यात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकला कॅसिनोच्या जहाजावर जायची होतेच होते आणि असेही म्हटले जाते की, गोव्याला सर्वात जास्त टॅक्स हा कॅसिनोच्या माध्यमातूनच मिळतो. कॅसिनोच्या आवारात रोजच्या रोज संध्याकाळपासून लोकांची रेलचेल वाढत जाते जी अखंड रात्रभर चालू असते मौज-मजा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

CJP Press Conference: 'देशात आणीबाणीपेक्षाही भयावह परिस्थिती', आशुतोष रांकाचा मोदी सरकारवर हल्लाबोल; ज्ञानेश कुमारांना वाचवण्यासाठी केंद्राची धडपड

IND vs WI 4th T20: संजूचा खराब फॉर्म टीम इंडियासाठी डोकेदुखी! चौथ्या टी-20मधून पत्ता कट, वैभव सूर्यवंशीची होणार एन्ट्री?

BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

Upcoming Cars: नवीन कार खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! मारुतीची 7-सीटर इलेक्ट्रिक MPV येणार, तर Hyundai आणणार नवी SUV; फीचर्सची होतेय चर्चा

Delhi Protest: संवादाचे दरवाजे बंद करणाऱ्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाची चपराक; जंतरमंतरवरील निर्बंध तातडीने उठवण्याचे आदेश!

SCROLL FOR NEXT