Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Rohan Khaunte: बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा नव्हे! पर्यटन मंत्री म्हणतात खरा गोवा...

मडगावात 23 व्या सारस्वत चैतन्य गौरव सोहळा

गोमंतक ऑनलाईन टीम

Rohan Khaunte: बीच, कॅसिनो, धागडधिंगा म्हणजे गोवा नव्हे. गोव्याची खरी श्रीमंत ही सांस्कृतिक परंपरेत आहे आणि याच सांस्कृतिक परंपरेद्वारे देश विदेशी पर्यटकांना गोव्याकडे आकर्षित करणे गरजेचे आहे. गोव्याची ही परंपरा सर्वांनी जपली पाहिजे, पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.

मडगावात रवींद्र भवनात मुंबईच्या सारस्वत प्रकाशन व गोवा सारस्वत समाज यांच्या संयुक्त विद्यमाने 23 व्या सारस्वत चैतन्य गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पर्यटन मंत्री खंवटे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी आमदार विजय सरदेसाई उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत म्हणाले, सारस्वतांसाठी गौरव सोहळा आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तो मठग्राममध्ये संपन्न होत असल्याने आम्हांला अधिकच आनंद होत आहे.

इतर समाजांना बरोबर घेऊन जाण्याची मोठी जबाबदारी सारस्वत समाजावर आहे. सारस्वत समाजातील गरजूंना समाजाने मदतीचा हात द्यावा.

मान्यवरांचा सत्कार

सोहळ्यात वकील प्रकाश श्रीरंग प्रभुदेसाई, शाणू आत्माराम पै पाणंदीकर, शेखर रवींद्र सरदेसाई, केशव (राजू) मेघश्याम नायक, रामनाथ पै रायकर, नितीन कुंकळ्ळीकर, डॉ. प्रदीप बोरकर, सारस्वत विद्यालय सोसायटी, पुर्ती अमेय लोटलीकर यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच सारस्वत प्रकाशनने घेतलेल्या कथा व कविता स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली.

गोवा सारस्वत समाजाचे अध्यक्ष डॉ. जगन्नाथ (देश) प्रभुदेसाई, सारस्वत प्रकाशनाचे अध्यक्ष दिलीप भिसे तसेच गौरवप्राप्त मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सारस्वत प्रकाशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी आभार व्यक्त केले. प्रसाद कुलकर्णी व डॉ. स्मिता संझगिरी यांनी सूत्रसंचालन केले.

या सोहळ्यात आयोजक कार्याध्यक्ष नवनाथ खांडेपारकर, गोवा सारस्वत समाजाचे शिरीष पै, सारस्वत प्रकाशनचे संपादक सुधाकर लोटलीकर, कार्यवाह राहुल साखळकर हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bogus Voter List: सांताक्रुझमध्ये 3000, सुरावलीमध्ये 100 बोगस मतदार; काँग्रेसकडून पुरावे सादर; छोट्या घरात 26 नावे असल्याचा दावा

Lairai Stampede: 'लईराई' दुर्घटनेवरून अधिकाऱ्यांचे समितीकडे बोट, सूचना टाळल्याचा दावा; काय होता चौकशी समितीचा निष्कर्ष? वाचा..

Shivaji Maharaj: तोरणा किल्ल्यावर धन सापडले, शिवाजी महाराजांनी उभा केला अद्भुत गड; तरुणांसाठी प्रेरणादायी गोष्ट

World Elephant Day 2025: गजराजाची भव्य मिरवणूक, पारंपारिक वाद्यांचा गजर, अन्...; जाणून घ्या जागतिक हत्ती दिनानिमित्त केरळातील अनोखा 'त्रिशूर पूरम उत्सव'!

Rashi Bhavishya 12 August 2025: नवी कामे सुरू करण्यासाठी दिवस अनुकूल, रातील मतभेद मिटतील; प्रेमसंबंध दृढ होतील

SCROLL FOR NEXT