Goa 

Tourism 

 

Dainik Gomantak 

गोवा

गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांच्या संख्येत घट

व्यावसायिक धास्‍तावले : पर्यटन हंगाम अंतिम टप्‍प्‍यात, तरीही खर्च सुटेना

दैनिक गोमन्तक

कळंगुट: यंदाचा पर्यटन (Tourism) हंगाम जवळजवळ शेवटच्या टप्प्यात आला, तरी बार्देशातील कळंगुट आणि बागा किनाऱ्यावर पर्यटकांची संख्‍या रोडावल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवल्याचे दिसून येते.

कोविड-19 (COVID-19) महामारीच्या प्रकोपानंतर दोन वर्षांच्या अवधीने स्थानिक शॅक मालक, तसेच हॉटेलवाल्यांपासून अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपापल्या कुवतीनुसार सप्टेंबरच्या मध्यावर व्यवसाय थाटला होता. परंतु, पावसाने नोव्‍हेंबरपर्यंत हजेरी लावल्‍याने निदान डिसेंबर महिन्यात तरी चांगला व्‍यवसाय होईल, या अपेक्षेने होते. मात्र, पर्यटकांची (Tourist) संख्‍या रोडावल्‍याने निराशा झाली आहे.

किनारी भागात साधे कपड्यांचे दुकान जरी थाटायचे झाल्यास दुकान मालकाला महिना वीस ते पंचवीस हजार रुपये मोजावे लागतात. त्यामुळे एकाबाजूने विदेशी पर्यटकांनी किनारी भागांकडे केलेली पाठ आणि दुसऱ्या बाजूने ओमिक्रॉनची (Omicron variant) भीती या दुहेरी संकटात सापडलेल्या येथील व्यावसायिकांनी शेवटचा उपाय म्हणून आता देवाकडेच आपल्या नजरा लावल्याचे या भागातील हॉटेल तथा रेस्टॉरंट चालक स्थानिक तरुण सूरज नाईक यांनी ‘दै. गोमन्‍तक’शी बोलताना सांगितले. रेंट अ बाईक व्‍यावसायिकांमुळे आधीच टॅक्‍सी व्‍यवसाय डबघाईला आला आहे. त्‍यानंतर कोरोना महामारीने त्रस्‍त केले आहे. परिणामी जगायचे कसे, असा प्रश्‍‍न टॅक्‍सी व्‍यावसायिकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

नुकसान कसे भरून निघणार?

दर आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवसांत देशी पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारी भागात उतरताना दिसतात. मात्र, विदेशी पर्यटकांच्‍या तुलनेत त्यांच्या खर्च करण्यावर मर्यादा असल्याने येथील व्यवसाय उभा करण्यासाठी लावलेला लाखोंचा पैसा येत्या एक-दोन महिन्यांत कसा काय भरून निघणार, या विवंचनेत आपण असल्याचे स्थानिक शॅकमालक टोनी रॉड्रिगीस यांनी सांगितले. दरवर्षीच्या मानाने कळंगुट तसेच बागा येथील किनारी भागात विदेशी पर्यटकांची संख्या सध्या दहा टक्क्यांहून कमी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदाच्या ख्रिसमस तसेच नववर्षाच्या निमित्ताने अधिकाधिक विदेशी पर्यटक गोव्यातील किनारी भागात उतरतील, यासाठी सरकारने सर्वतोपरीने प्रयत्नशील राहाण्याची जोरदार मागणी सध्या या भागातील त्रस्त व्यावसायिक करीत आहेत.

कोविड महामारी आणि त्‍यानंतर डिसेंबरपर्यंत लांबलेला पाऊस आणि त्यानंतर सध्या जगभरात घोंघावणारा ओमिक्रॉन यामुळे नेहमीच्या मानाने यंदा अपेक्षित पर्यटकवर्ग सध्या तरी याभागात दिसत नाही. ख्रिसमस आणि नववर्षाच्या निमित्ताने हा आकडा निश्चितच दुप्पट होणार यांत शंका नाही. दोन दिवसांपूर्वी चार्टर्ड विमानांचे येणे सुरू झाले आहे. त्यामुळे राज्याचा आर्थिक कणा असलेल्या पर्यटन (Tourism) व्यवसायाला चालना देण्यासाठी तसेच किनारी भागातील पर्यटन फुलवण्यासाठी सरकारकडून प्रयत्नांची पराकाष्ठा होणे आज काळाची गरज आहे.

- शॉन मार्टिन्‍स, सरपंच कळंगुट पंचायत

देशी पर्यटक येथे राज्‍यात पाऊल ठेवताच सहज उपलब्ध असलेल्या दुचाक्यांच्या मदतीने पर्यटक भटकतात. त्यामुळे टॅक्सी चालकांची येथे आड तेथे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. किनारी भागातील घराघरांतून पर्यटकांसाठी सहज दुचाक्या उपलब्ध करून दिल्या जातात. स्थानिक टॅक्सी चालकांचा व्यवसाय सध्या ‘राम भरोसे’च असून दिवसांतून एक जरी भाडे मिळाले, तरी लॉटरी फुटल्यागत आमची परिस्थिती होते.

- मान्‍युएल डिसोझा, स्‍थानिक टॅक्‍सीचालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT