High Court of Bombay at Goa
पणजी: महिलेच्या खासगी जागी बोट लावणे हा लैंगिक अत्याचार नव्हे तर लैंगिक छळ किंवा विनयभंग होऊ शकतो, असे निरीक्षण गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयाने नोंदवले आहे. यावरुन गेस्ट हाऊसच्या संशयित कर्मचाऱ्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात हणजूण पोलिसांत दाखल गुन्ह्यावरील सुनावणी न्यायलायात सुरु असताना न्या. भरत देशपांडे यांनी हा निर्णय दिला.
महिलेच्या खासगी जागी बोट लावणे हा लैंगिक अत्याचार होऊ शकत नाही. तो लैंगिक छळ किंवा विनयभंग होऊ शकतो, असे निरीक्षण नोंदवत संशयिताला जामीन मंजूर करण्यात आला. गेस्ट हाऊसमध्ये कामाला असणारा संशयित मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असून, त्याच्याविरोधात २८ सप्टेंबर २०२४ रोजी हणजूण पोलिसांत पर्यटक महिलेने तक्रार दाखल केली होती.
काय आहे प्रकरण?
एक पर्यटक महिला गोव्यात पर्यटनासाठी आली होती. बार्देशमधील एका गेस्ट हाऊसमध्ये ती थांबली होती. दरम्यान, २८ सप्टेंबर २०२४ रोजी महिला झोपेत असताना संशयित गेस्ट हाऊसच्या कर्मचाऱ्याने महिलेच्या खासगी भागाला बोटाने स्पर्श केला. महिलेने आरडाओरडा केल्यानंतर संशयिताने घटनास्थळावरुन पळ काढला होता.
याप्रकरणी पीडित महिलेने हणजूण पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती. गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु असताना न्यायालयाने वरील निरीक्षण नोंदवत संशयिताला जामीन मंजूर केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.