Dengue In Goa: राज्यात आत्तापर्यंत डेंग्यूचे तब्बल 11010 संशयित रुग्ण सापडल्याने खळबळ माजली आहे. सध्या डेंग्यूने डोके वर काढले असून जनतेत घबराट पसरली आहे. कांदोळी, मुरगाव, चिंबल बरोबर राज्यभर रुग्ण सापडत असल्याने लोकांनी सावधगिरी बाळगून आपल्याबरोबर इतरांचेही आरोग्य जपायला हवे.
डासांची बेसुमार पैदास
अनियोजित व अनियंत्रित शहरीकरण.
कचऱ्याचे अपुरे व अयोग्य व्यवस्थापन.
हवामानातील बदल, परिसर अस्वच्छता
पाण्याची अयोग्य साठवणूक
आठवड्यातून एकदा घरातील भांडी रिकामी करावी.
पाणी साठवलेल्या भांड्यांना झाकून ठेवा.
घराभोवतालची जागा स्वच्छ आणि कोरडी ठेवावी.
घरात व परिसरात टाकाऊ साहित्य ठेवू नये.
डेंग्यूचा संसर्ग हा विषाणू बाधित एडिस एजिप्टाय डास चावल्यामुळे होतो. हा डास दिवसा चावणारा असून या तापाचा प्रसार ‘मानव- डास - मानव’ असा असतो. या डासांची उत्पत्ती घरातील व परिसरातील भांडी, टायर्स, टाक्या व टाकाऊ वस्तू यात साठविलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
डेंग्यू तापाची लक्षणे ही इतर विषाणुजन्य गंभीर तापाच्या लक्षणांसारखीच असतात. उदा. अचानक चढणारा ताप, डोके दुखी, अंगदुखी, सांधेदुखी व डोळ्यांच्यामागे दुखणे ही डेंग्यू तापाची गंभीर अवस्था आहे. याची सुरुवात तीव्र तापाने होते व त्याचासोबत डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी ही लक्षणे असतात. शेवटी कमालीचा अशक्तपणा येतो.
1 जागतिक स्तरावर पाहिले तर या डेंग्यूमुळे एकूण सात लाख लोक मृत्यू पावतात. यंदा राज्यात आत्तापर्यंत 16 संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
2 डब्ल्यूएचओच्या आकडेवारीनुसार दरवर्षी 39 कोटी लोकांना डेंग्यूची लागण होत असावी असा अंदाज आहे. हे प्रमाण मलेरियापेक्षा कमी असले, तरीही मोठी समस्या आहे.
साठलेल्या पाण्यात
अर्धवट भरलेली बाटलीत
पाणी साचलेले टायर
अर्धवट पाणी साचलेली कुंडीडबक्यात
साठलेले पाणी
घरातील शोभेची झाडे
पावसाळी हंगामात संसर्गजन्य रोग वाढत असतात. मच्छर, टिक्स, पिसू आणि माश्या ह्या कीटकांमुळे हे आजार पसरतात. राज्यात डेंग्यूचा प्रसार वाढत असला तरी एका कालखंडानंतर तो कमी होऊ लागतो. अशा प्रकारच्या रोगांची लक्षणी कधी कधी सौम्य किंवा गंभीर असू शकतात. त्यामुळे खास काळजी घ्यावी लागते. लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.- डॉ.प्रशांत सुर्यवंशी, साथरोग प्रमुख, आरोग्य विभाग, गोवा
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.