Torxem school issue Dainik Gomantak
गोवा

Torxem school issue: तोरसे येथे विद्यार्थ्यांची सुरक्षा धोक्यात; पालकांनी घेतला आंदोलनाचा पवित्रा

तोरसे हायस्कूलची सुरक्षा भिंत रस्त्यासाठी पाडली

दैनिक गोमन्तक

गेल्या काही दिवसांपासून पेडणे तालुक्यातील तोरसे येथील हायस्कूलची सुरक्षा भिंत सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यासाठी पाडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. हा प्रश्न न सुटल्यास हायस्कूल व्यवस्थापन आणि पालक वर्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

(Torxem Locals and school management in protest due to rising accidents)

मिळालेल्या माहितीनुसार तोरसे हायस्कूलच्या एका बाजूची सुरक्षा भिंत सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यासाठी पाडली आहे. या ठिकाणी गेल्या काही दिवसांपुर्वी अपघात घडला होता. यात माय लेकीला आपले प्राण गमावेवे लागले होते. यातच आता भिंत पाडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पालक वर्ग आणि हायस्कूल व्यवस्थापनाला सतावत आहे.

सुरक्षा भिंत नसल्याने विद्यार्थी थेट राष्ट्रीय महामार्ग 66 वर जाऊ शकतात. त्यामूळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. त्यामूळे हायस्कूलची सुरक्षा भिंत सार्वजनिक बांधकाम खात्याने तातडीने बांधावी अन्यथा आंदोलन छेडणार असल्याचे आज पालक वर्ग आणि हायस्कूल व्यवस्थापनाने म्हटले आहे.

याबाबत बोलताना शालेय समिती अध्यक्ष व माजी जिल्हा पंचायत सदस्य सूर्यकांत तोरस्कर म्हणाले कि, चार पदरी महामार्गासाठी हायस्कूलच्या एका बाजुचा रस्ता व भाग कापुन टाकला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना धोका निर्माण झालेला आहे. याचा विचार करुन महामार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत हा रस्ता व येथे संरक्षक भिंत बांधून द्यावी तसेच रस्त्याचे डांबरीकरण करावे अन्यथा आम्हाला आंदोलन उभारावे लागेल. असे म्हटले आहे.

यावर तोरसेच्या सरपंच प्रार्थना मोटे बोलताना म्हणाल्या कि, हल्लीच येथे एका मोठा अपघात झाला आहे. यात माय लेकींना आपले प्राण गमवावे लागले आहेत .अशा दुर्घटनेत जर या शाळेची मुले येथे असतील तर मोठा अनर्थ घडला असता. याचा विचार करुन त्वरीत रस्ता व संरक्षक भिंत बांधावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT