latest Goa updates Dainik Gomantak
गोवा

Goa News: भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी.

Akshata Chhatre

India Pakistan Ceasefire: भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देश युद्धविरामाबाबत एकमतावर आले असून, यासंदर्भात लष्करी कारवाई थांबवण्यावर सामंजस्य करार झाला आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी दिली.

विद्यार्थी व्हिसावर भारतात असलेल्या नायजेरियन नागरिकाला ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक 

गुन्हा शाखेने १.६ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह नायजेरियन नागरिकाला अटक केली. तेलंगणा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीवरून कारवाई करत, गोवा गुन्हा शाखेने २३ वर्षीय नायजेरियन नागरिक नन्यालुगो अबासिली याला १,१२३ ग्रॅम एक्स्टेसी, ७ ग्रॅम कोकेन आणि इतर ड्रग्जसह एकूण १.६ कोटी रुपयांच्या किमतीचे ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली अटक केली. सध्या विद्यार्थी व्हिसावर भारतात असलेला आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली प्रभुदेसाईंच्या विरोधात कारवाई 

पेडणे पोलिसांनी उदय प्रभुदेसाई आणि उगम प्रभुदेसाई यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवली तक्रारदार कोरगावच्या पंच सदस्यांना कायदेशीर कर्तव्ये पार पाडण्यापासून रोखल्याबद्दल, धमकी दिल्याबद्दल आणि लैंगिक अत्याचार केल्याचा प्रभुदेसाई यांच्यावर आरोप आहे.

बीएनएफ मायनिंग प्लांट सांगे येथे मोठी आग

बीएनएफ मायनिंग प्लांट सांगे येथे मोठी आग लागली. स्थानिकांचे म्हणणे आहे की रासायनिक कचरा आणि बॅरल सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे टाकल्यामुळे ही आग लागली असावी. कुडचडे येथील अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी पोहोचले आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.

पाकिस्तानला आता निसर्गाचा फटका

पाकिस्तानला आज पहाटे भूकंपाने धक्का दिला. राष्ट्रीय भूकंपशस्त्र केंद्राकडून घटनेची पुष्टी.

गोव्यातील विद्यार्थी अनंत जितेंद्र आमशेकरची इस्त्रोतर्फे आयोजित जिव्हिका २०२५ मध्ये युवा वैज्ञानिक म्हणून निवड

लोलये येथील श्री दामोदर विद्यालयाचा विद्यार्थी अनंत जितेंद्र आमशेकर याची इस्त्रोतर्फे आयोजित जिव्हिका २०२५ मध्ये युवा वैज्ञानिक म्हणून निवड. देशभरातील ३५० युवा वैज्ञानिक या कार्यक्रमात सहभागी होणार. तिरुअनंतपुरम येथील इस्रोच्या स्पेस केंद्रात हा कार्यक्रम होणार आहे.

विक्रम गायकवाड यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन. मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास.

अपघातात जखमी सुर्ला सत्तरीतील युवकाचे निधन

चोर्ला घाट जांभळीकडे या ठिकाणी काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी सुर्ला सत्तरीतील सुरज भिकाजी गावकर (२७) या युवकाचा जीएमसीत उपचारा दरम्यान मृत्यू.

धारगेत बिबट्याचा घरात घुसून मांजरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न

धारगे, तांबडीसुर्ल-साकोर्डा येथील संतोष च्यारी यांच्या घरात रात्रीच्यावेळी अचानकपणे बिबट्याने घुसून मांजरीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. बिबट्याच्या तावडीतून मांजराने स्वतःची केली सुटका तसेच संतोष च्यारी हे देखील हल्ल्यातून सुदैवाने बचावले. बुधवारी रात्रीची घटना.

शिरगाव चेंगराचेंगरीत तथ्य शोध समितीने अहवाल; तत्कालीन उत्तर गोवा एसपी, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीला धरले जबाबदार

शिरगाव चेंगराचेंगरीत तथ्य शोध समितीने अहवालात तत्कालीन उत्तर गोवा एसपी, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीला जबाबदार धरले आहे. तथ्य शोध समितीने शिरगाव चेंगराचेंगरीवरील आपला अहवाल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सोपवला आहे. अहवालात म्हटले आहे की उत्तर गोव्याचे माजी एसपी अक्षत कौशल, उत्तर गोव्याचे माजी जिल्हाधिकारी स्नेहा गित्ते, देवस्थान समिती, माजी डीवायएसपी जीवबा दळवी, डिचोलीचे माजी उपजिल्हाधिकारी भीमनाथ खोरजुवेकर, डिचोलीचे माजी पीआय दिनेश गाडेकर, पंचायत आणि पंचायत सचिव हे चेंगराचेंगरीसाठी जबाबदार आहेत. सरकार आता अहवालाची तपासणी करत आहे आणि चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई होईल.

युद्धजन्य स्थितीमुळे गोव्यातील भारतीय राखीव दलाच्या पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

सुट्टीवर असलेल्या पोलिसांना ताबडतोब रुजू होण्याचे आदेश मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: बाणावली बीचवर 'डॉल्फिन'चं दर्शन! मच्छीमार पेले यांनी शेअर केलेला व्हिडिओ Viral, समुद्रातील अद्भुत दृश्य एकदा पाहाच

Astrology: लग्नात अडचणी येतायेत? 'हे' अशुभ ग्रह ठरतात अडथळा, काय सांगते तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांची स्थिती? जाणून घ्या

Amol Muzumdar: ‘..हा पुढचा सचिन तेंडुलकर'! पदार्पणात 260 धावांची खेळी, हिटमॅन रोहितला दिली संधी; विश्वचषकामागचा 'नायक'

Goa Politics: 'स्थलांतरित-समर्थक' सरकार दीड वर्षात पडणार, RGP स्थापन करणार पुढचे सरकार! मनोज परब यांचा मोठा दावा

SIR Campaign In Goa: गोव्यात 'एसआयआर' मोहिमेला सुरुवात, बूथ लेव्हल अधिकारी करणार डोर-टू-डोर सर्व्हे; डॉक्युमेंट तयार ठेवण्याचे मतदारांना आवाहन

SCROLL FOR NEXT