Goa Marathi Breaking News Dainik Gomantak
गोवा

Goa News: नागझर- कुर्टी येथील सीताराम नाईक यांच्या घरावर माड कोसळला, वाचा दिवसभरातील घडामोडी

Today's Marathi Breaking News: जाणून घ्या गोव्यातील ताज्या घडामोडी. राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी.

गोमंतक ऑनलाईन टीम

नागझर- कुर्टी येथील सीताराम नाईक यांच्या घरावर माड कोसळला

नागझर- कुर्टी येथील सीताराम नाईक यांच्या घरावर माड कोसळला. अंदाजे १ लाख रुपये पेक्षा अधिक नुकसान. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मदत कार्य

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी झारखंडच्या कामगारास डिचोली पोलिसांकडून अटक

अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी झारखंडच्या कामगारास डिचोली पोलिसांकडून अटक. मुलीची सुखरूप सुटका. डिचोलीतील लाडफे परिसरातून 13 वर्षीय मुलगी गेल्या रविवारपासून होती बेपत्ता

कुंभारजुव्यात फेरी बोट दुर्घटना थोडक्यात टळली

कुंभारजुव्यात प्रवाशांसह एक फेरी बोट अचानक नदीच्या मध्यभागी थांबल्याने मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. नंतर फेरीचे इंजिन दुरुस्त करण्यात आले आणि सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे फेरी पॉइंटवर आणण्यात आले.

"आमदार म्हणून मी खूप आनंदी आहे, मंत्रिपदाची इच्छा नाही" आमदार राजेश फळदेसाई

आमदार म्हणून मी खूप आनंदी आहे, मंत्रिपदाची इच्छा नाही. मुख्यमंत्र्यांच्या पाठिंब्याने सर्व काही व्यवस्थित आणि चांगले चालले आहे: आमदार राजेश फळदेसाई

"बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना समकक्ष प्रमाणपत्रे प्रदान करणार" मुख्यमंत्री

गोवा सरकार बौद्धिक अपंगत्व असलेल्या व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षणासह दहावी आणि बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्रे प्रदान करेल अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली

९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या उपस्थितीत ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आगामी आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट २०२५ बद्दल माहिती दिली

नशामुक्त भारतप्रमाणे नशामुक्त गोवा राबवणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारतरमाणेच नशामुक्त गोवा हाती घेतले जाणार असून लोकांबरोबर पालकांनी आपल्या युवा मुलांवर लक्ष ठेवावे. ड्रस्गच्या गैरव्यवहारात कोणीही गुंतू नये. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. डिचोली पोलिसांच्या ड्रग्सविरोधी जनजागृती फेरीला मुख्यमंत्र्यांनी दाखवला बावटा

गोवा सरकारने 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अ‍ॅप' केले लाँच

गोवा सरकारने 'गोवा टॅक्सी ड्रायव्हर अ‍ॅप' लाँच केले. गोवा सरकारने परिवहन विभाग आणि पर्यटन विभागाच्या माध्यमातून गोवा टॅक्सी ड्रायव्हर अ‍ॅप लाँच केले. अ‍ॅप-आधारित ५० राइड पूर्ण करणाऱ्या पहिल्या ५०० ड्रायव्हर्सना २५ लिटर मोफत इंधन (पेट्रोल, डिझेल किंवा सीएनजी) मिळेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ड्रायव्हर्सना सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत ३० दिवस सक्रिय राहावे लागेल.

पणजीमध्ये पुन्हा आढळलं गांजाचं रोपं

करंझाळेममधील टोंक येथील ग्रीन एकर्स हॉलजवळ एक संशयास्पद गांजाचं रोप आढळून आलं आहे.

फोंडा पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त काढली मिरवणूक

फोंडा पोलिसांनी अमलीपदार्थ विरोधी दिनानिमित्त विध्यार्थ्यांसह शहरात काढली मिरवणूक.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Mini Auction 2026: केकेआरचा 'मास्टरस्ट्रोक'! मथीशा पाथिरानाला 18 कोटींत केलं खरेदी; सीएसकेच्या 'बेबी मलिंगा'वर शाहरुखने लावली मोठी बोली

Luthra Brothers Arrested: 'बर्च बाय रोमिओ लेन' च्या मालकांचा खेळ खल्लास! दिल्ली विमानतळावर लुथरा बंधूंना गोवा पोलिसांकडून अटक

IPL Mini Auction 2026: पैशांचा पाऊस! कॅमेरुन ग्रीनसह 'हे' 4 खेळाडू आयपीएल लिलावात मालामाल; मोडले सर्व रेकॉर्ड्स

Border 2 Teaser: 'लाहोरपर्यंत आवाज गेला पाहिजे...' पाकिस्तानला धडकी भरवणारा बॉर्डर 2 चा टीझर रिलीज; देओलचा रुद्र अवतार पाहून व्हाल अवाक VIDEO

Goa Assembly Winter Session 2026: गोवा सरकारचे हिवाळी अधिवेशन 12 जानेवारीपासून; रामा काणकोणकर हल्ला, हडफडे आग प्रकरण गाजणार

SCROLL FOR NEXT