Govind Gawde Dainik Gomantak
गोवा

GoaNews: गावडे समर्थक सरपंचांवर अविश्वासाची टांगती तलवार! वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

Today's Marathi breaking News: गोव्यातील राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी

गोमंतक ऑनलाईन टीम

गावडे समर्थक सरपंचांवर अविश्वास ठराव येणे सुरू,पहिला ठराव बेतकी सरपंचांवर

मंत्रिमंडळातून डच्चू दिल्यानंतर गोविंद गावडे समर्थक सरपंचांवर अविश्वास ठराव दाखल होण्यास सुरुवात. बेतकी खांडोळाचे सरपंच विशांत नाईक यांच्यावर ९ पैकी ५ पंच सदस्यांनी फोंडा गट विकास कार्यालयात दाखल केला अविश्वास ठराव. गावडेंना २४ तासांच्या आता पहिला झटका.

प्रत्येक विभागाने कामाच्या ठिकाणी योगासने सुरू करावीत - मुख्यमंत्री

20 शेतकऱ्यांना चार महिने दुधाचा पगार बोनस मिळत नसल्याच्या तक्रारी

तांबोसे दुग्ध उत्पादन सहकारी सोयटीमार्फत 20 शेतकऱ्यांना चार चार महिने दुधाचा पगार बोनस मिळत नसल्याच्या तक्रारी,सहकार मंत्र्यांनी लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी केली,नियुक्त चेअरमन अनिशा सामंत यांच्या निवासस्थानी शेतकरी यांनी भेट दिली तर ती उपलब्ध झाली नाही.

"मंत्री गोविंद गावडे यांना दिलेला डच्चू बद्धल भाष्य करणार नाही" दीपक ढवळीकर

"राज्यात भाजप- मगो पक्षाची युती असल्याने कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांना दिलेला डच्चू बद्धल भाष्य करणार नाही. भाजपचा निर्णय असू शकतो." दीपक ढवळीकर

"सरकारने गोविंद गावडे यांना आधीच काढून टाकायला हवे होते" मनोज परब

सरकारने गोविंद गावडे यांना आधीच काढून टाकायला हवे होते. त्यांनी गोविंद गावडेना काढून टाकण्यात खूप उशिरा केले.मंत्री असताना गोविंद गावडे यांनी कला आणि संस्कृती विभाग आणि क्रीडा विभागही उद्ध्वस्त केला आहे असे आरजीपी प्रमुख मनोज परब यांनी सांगितल.

मुख्यमंत्र्यांबाबत प्रेरणादायी स्टोरी लिहा व बक्षीस मिळवा

मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची यशस्वीपणे सहा वर्षे पूर्ण केल्याबद्दल साखळी नगरपालिकेतर्फे मुख्यमंत्र्यांबद्दलच्या प्रेरणादायी स्टोरी तसेच मुख्यमंत्र्यांच्या सहवासात किंवा भेटीदरम्यान स्वतःला आलेले अनुभव कहाणी स्वरूपात लिहिण्याची स्पर्धा आयोजित केली आहे.

पूल लवकरात लवकर दुरुस्त करण्याची मागणी

पेडणे पालिका क्षेत्रातील कोटकर वाडा या ठिकाणी मुख्य रस्ता पेडणे मार्गे कोरगाव हरमल जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर एक जुना मिनी साकव पूल आहे. त्या पुलाखालील माती दगड हळूहळू कोसळत असून हा पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर दुरुस्ती किंवा त्या ठिकाणी नवीन पूल उभारण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी. अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

मोरजीत ४ परिसरांना अस्वच्छ कामकाजामुळे बंद करण्याचे निर्देश

एफडीए टीमने मोरजी येथे पाळत ठेवण्याची मोहीम राबवली. पथकाने २१ परिसरांची तपासणी केली, त्यापैकी ४ परिसरांना अस्वच्छ कामकाजामुळे बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. इतर सर्वांना १४ दिवसांच्या आत पालन करण्याचे निर्देश देऊन सुधारणा सूचना देण्यात आल्या.

"पंढरपूरात गोवा भवन करण्याचा मनोदय" मुख्यमंत्री

पंढरपूर येथे जाणाऱ्या गोव्यातील भाविकांसाठी गोवा भवन उभारण्याचा सरकारचा मनोदय आहे. त्यासाठी सुमारे ४ हजार चौ. मी. जागा मिळाल्यास लगेच ते पूर्ण करणार. तेथील जिल्हाधिकाऱ्यांशी आपण संपर्कात असून हि इच्छाही लवकरच पूर्ण होणार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: रोहन हरमलकरांचा पाय खोलात; जमीन हडप प्रकरणी ईडीने 212 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता केली जप्त

Goa Assembly Live: नोकऱ्या नसल्याने तरुणाई व्यसनांच्या विळख्यात; युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप!

Report: पाकिस्तानात 8700 दहशतवादी सक्रिय! संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातून धक्कादायक खुलासा, भारतासाठी धोक्याची घंटा

USA Tariff: रशियाशी जवळीक पडली महागात? अमेरिकेने भारतावर लावला 25 टक्के टॅरिफ, शेअर बाजारात भूकंपाची शक्यता!

Raksha Bandhan: रक्षाबंधनाला कधीपर्यंत राखी बांधता येईल? भद्रकाळ टाळा, नेमका शुभमुहूर्त जाणून घ्या

SCROLL FOR NEXT